कळंब तालुका (धाराशिव)
कळंब तालुका, धाराशिव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
?कळंब तालुका, धाराशिव महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
विभाग | छत्रपती संभाजीनगर |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | उस्मानाबाद |
विधानसभा मतदारसंघ | धाराशिव 242 |
तहसील | कळंब तालुका, धाराशिव |
पंचायत समिती | कळंब तालुका, धाराशिव |
कोड • पिन कोड |
• 413507 |
तालुक्यातील गावे
संपादनआढळा अडसूळवाडी आंदोरा (कळंब) आथर्डी आवाडशिरपुरा बाभळगाव (कळंब) बहुळा बनगरवाडी (कळंब) बारामाचीवाडी बारटेवाडी भातसांगवी भातशिरापुरा भोगाजी भोसा (कळंब) बोर्डा (कळंब) बोरगाव (कळंब) बोरगाव बुद्रुक (कळंब) बोरगाव खुर्द (कळंब) बोरवंती चोराखळी दाभा (कळंब) दहीफळ (कळंब) देवधानोरा देवळाली (कळंब) ढोराळा डिकसळ (कळंब) दुधाळवाडी एकुरका गंभीरवाडी गौर (कळंब) गौरगाव (कळंब) घारगाव गोविंदपूर (कळंब) हळदगाव (कळंब) हासेगाव हासेगावकेज हावरगाव हिंगणगाव (कळंब) इटकूर जायफळ (कळंब) जावळाखुर्द (कळंब) कान्हेरवाडी (कळंब) करंजकल्ला खडकी (कळंब,उस्मानाबाद) खामसवाडी खेरडा (कळंब) खोंडाळा कोठळा कोठाळवाडी लासरा लोहाटा मलकापूर (कळंब,उस्मानाबाद) माळकरंजा मंगरूळ (कळंब,उस्मानाबाद) मस्सा मोहा (कळंब,उस्मानाबाद) नागुळगाव नागझरवाडी नायगाव(कळंब) निपाणी (कळंब) पाडोळी (कळंब) पानगाव परतापूर पाथर्डी (कळंब) पिंपळगावडोळा पिंपरी (कळंब) रायगव्हाण रांजणी (कळंब) रत्नापूर (कळंब) संजीतपूर सापणाई सातेफळ (कळंब, उस्मानाबाद) सातरा सौंदाणा सौंदाणाआंबा शेळगाव (कळंब) शेळगावदिवाणी शेळकाधानोरा शिंगोळी (कळंब) शिरढोण (कळंब) ताडगाव (कळंब) तांदुळवाडी (कळंब) उमरा (कळंब) उपळाई (कळंब) वडगाव (कळंब,उस्मानाबाद) वाघोली (कळंब) वाकडीइस्ताळ वाकडीकेज वाणेवाडी (कळंब) वाठवडा येरंडगाव (कळंब) येरमाळा
पार्श्वभूमी
संपादनतालुक्याच्या उत्तर भागातून मांजरा नदी वाहते. बीड व उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे.या मांजरा नदीला वाशिरा ही प्रमुख नदी मिळते. तसेच तेरणा नदीही या तालुक्यातून वाहते. कळंब शहर मांजरा नदीच्या तीरावर वसले असून याच नदीवर मांजरा धरण बांधण्यात आले आहे. या धरण भरल्यानंतर जलाशयाचे बॅकवॉटर कळंब शहरापर्यंत येते. कळंब शहर हे कपडा बाजारासाठी प्रसिद्ध असून शहरात नामांकित वस्त्रदालने आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ म्हणून कळंब बाजार समितीची ओळख आहे. तालुका खाजगी साखर कारखानदारीत नावलौकिकप्राप्त असून रांजणी, हावरगाव व चोराखळी येथे खाजगी साखर कारखाने तर वाठवडा येथे गूळपावडर उद्योग उभारण्यात आला आहे. कळंब शहरातुन निघनारी शिवजयंती ही राज्यात प्रसिद्ध आहे येथिल शिवजयंती पाहण्यासाठी शेजारील जिल्ह्यातुन देखील लोक येतात.
》तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट
• इटकूर • डिकसळ • नायगाव • शिराढोण • खामसवाडी • मोहा • येरमाळा
》तालुक्यातील महसूल मंडळे
१)इटकूर २)मोहा ३) येरमळा ४) शिराढोण ५) कळंब ६)गोविंदपूर ७) मस्सा ख ८) नायगाव
》तालुक्यातील आरोग्य सुविधा...
▪️ कळंब उपजिल्हा रुग्णालय
▪️प्राथमिक आरोग्य केंद्रे
१)इटकूर २) मोहा ३)येरमळा ४)मंगरूळ ५) दहिफळ ६)शिराढोण
▪️आरोग्य उपकेंद्रे----२७
▪️आपत्कालीन सेवा १०८ येरमळा, कळंब
पोलिस ठाणी...
- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,. कळंब
- कळंब...पोलिस ठाणे
- शिराढोण पोलीस ठाणे
- येरमाळा पोलीस ठाणे
- येरमाळा महामार्ग पोलीस ठाणे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
धाराशिव जिल्ह्यातील तालुके |
---|
धाराशिव तालुका | तुळजापूर तालुका | उमरगा तालुका | लोहारा तालुका | कळंब तालुका | भूम तालुका | वाशी तालुका | परांडा तालुका |