कलाबेन डेलकर
कलाबेन मोहनभाई डेलकर (२१ ऑगस्ट, १९७१:सुखला, वलसाड जिल्हा, गुजरात - ) या भारतीय राजकारणी आणि दादरा आणि नगर-हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. दादरा आणि नगर हवेलीच्या त्या पहिल्या महिला खासदार तसेच महाराष्ट्राबाहेरील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पण पहिल्या खासदार आहेत.[१][२]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९७१ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पद |
| ||
वैवाहिक जोडीदार | |||
| |||
तिचा विवाह सातवेळा खासदार असलेल्या मोहनभाई सानजीभाई डेलकर यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.[३]
त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सदस्या म्हणून २०२१ ची पोटनिवडणूक यशस्वीपणे लढवली. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महेश गावित यांच्यावर ५१,२७० मतांनी विजय मिळवला.
मार्च २०२४ मध्ये, डेलकर यांना २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नाव देण्यात आले व त्या विजयी ठरल्या.[४][५]
संदर्भ
संपादन- ^ "Kalaben Delkar wins Dadra and Nagar Haveli". Times of India. 4 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "Kalaben Delkar wins in Dadra and Nagar Haveli". Indian Express. 4 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "Kalaben Mohanbhai Delkar(Criminal & Asset Declaration)". My Neta. 4 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "Lok Sabha Elections 2024: Shiv Sena (UBT) MP Kalaben Delkar to Contest on BJP Ticket From Dadra And Nagar Haveli". Free Press Journal. 14 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "BJP fields Shiv Sena MP Kalaben Delkar from Dadra and Nagar Haveli". The Print. 14 March 2024 रोजी पाहिले.