ओकुमा शिगेनोबु
जपानी राजकारणी
ओकुमा शिगेनोबु (जपानी:大隈 重信; ११ मार्च, इ.स. १८३८:सागा, जपान - १० जानेवारी, इ.स. १९२२:तोक्यो, जपान) हा जपानचा पंतप्रधान होता. हा ३० जून, इ.स. १८९८ ते ८ नोव्हेंबर, इ.स. १८९८ आणि १६ एप्रिल, इ.स. १९१४ ते ९ ऑक्टोबर, इ.स. १९१६ अशा दोन कालखंडात या पदावर होता. शिगोनोबुने जपानमध्ये पाश्चात्य संस्कृती आणि विज्ञानास वाव दिला. हा वासेदा विद्यापीठाच्या स्थापकांपैकी एक होता.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत