ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१][२]
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७ | |||||
न्यू झीलंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ३० जानेवारी – ५ फेब्रुवारी २०१७ | ||||
संघनायक | केन विल्यमसन | अॅरन फिंच | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रॉस टेलर (१२३) | मार्कस स्टोइनिस (१८८) | |||
सर्वाधिक बळी | ट्रेंट बोल्ट (८) | जेम्स फॉकनर (४) मिचेल स्टार्क (४) |
पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला मालिकेमधून वगळण्यात आले.[३] त्याच्याऐवजी मॅथ्यू वेडकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि सॅम हेझलेटची स्मिथऐवजी संघात निवड करण्यात आली.[४] परंतु पहिल्या सामन्यात पाठीच्या दुखण्यामुळे वेडला संघातून वगळण्यात आले. आणि कर्णधारपदाची धुरा ॲरन फिंचकडे सोपवण्यात आली.[५] त्यानंतर दुसऱ्या सामन्याआधी वेडला संपूर्ण मालिकेतून वगळण्यात आले आणि उर्वरित सामन्यांमध्ये फिंचने नेतृत्व चालू ठेवले.[६]
न्यू झीलंडने मालिका २-० ने जिंकून चॅपेल-हॅडली चषकावर पुन्हा हक्क प्रस्थापित केला.[७]
संघ
संपादनन्यूझीलंड[८] | ऑस्ट्रेलिया[९] |
---|---|
- हॅमस्ट्रींगच्या समस्येमुळे मार्टिन गुप्टिलला वगळून त्याच्या ऐवजी डीन ब्राउनलीचा सामावेश करण्यात आला.[१०]
- अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी टॉम ब्लंडेल ऐवजी इश सोढीची संघात निवड.[११]
- हॅमस्ट्रींग दुखापतीतून तंदुरुस्त न झाल्याने गुप्टिलला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून सुद्धा वगळले गेले.[१२]
एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीूय एकदिवसीय पदार्पण: सॅम हेझलेट (ऑ)
- पाठीच्या तक्रारीमुळे मॅथ्यू वेड ऐवजी अॅरन फिंचचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना.[१३]
- एकदिवसीय सामन्यामध्ये मार्कस स्टोइनिसचा (ऑ) पहिला बळी आणि पहिले शतक.[१४] एका सामन्यात एका शतकासह तीन गडी बाद करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच खेळाडू.[१५]
- पॅट कमिन्सचे (ऑ) ५० एकदिवसीय बळी पूर्ण.[१४]
२रा सामना
संपादनवि
|
||
- पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- रॉस टेलरची नेथन ॲस्टलच्या न्यू झीलंड फलंदाजातर्फे सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी(१६).[१६]
- ट्रेंट बोल्टने त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली.[१६]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मधील दिवस-रात्र कसोटीसाठी इडन पार्क सज्ज". स्टफ.को.एनझेड (इंग्रजी भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मध्ये इडन पार्कवर दिवस-रात्र कसोटीचे न्यू झीलंडचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड दौर्यातून स्मिथला वगळले, वेड कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदी वेड". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सोअर वेड अनसर्टन फॉर नेपियर ओडीआय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वेडला चॅपेल-हॅडली चषकामधून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "टेलर, बोल्टच्या खेळीमुळे न्यू झीलंडचा २-० ने मालिकाविजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "चॅपेल-हॅडली चषक एकदिवसीय मालिकासाठी ब्लंडेल न्यू झीलंड संघात सामिल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "चॅपेल-हॅडली दौर्यासाठी वॉर्नरला विश्रांती". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गुप्टिलला दुसर्या एकदिवसीय सामन्यातून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "हॅमिल्टन एकदिवसीय सामन्यासाठी सोढीला पुन्हा बोलावले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गुप्टिल रुल्ड आऊट ॲज न्यू झीलंड एम्स टू रिगेन ट्रॉफी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नेपियर एकदिवसीय सामन्यात वेडचा सहभाग अनिश्चित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा, १ला ए.दि.: न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया, ऑकलंड, ३० जानेवारी २०१७". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / अष्टपैलू नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "घरच्या मैदानावर न्यू झीलंडचा सलग आठवा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.