आँधी (हिंदी चित्रपट)
आंधी हा संजीव कुमार आणि सुचित्रा सेन अभिनीत आणि गुलजार दिग्दर्शित १९७५ मधील एक भारतीय राजकीय नाट्यपट आहे. हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आणि त्यांच्या पतीसोबतच्या नातेसंबंधावर आधारित असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात हा चित्रपट राजकारणी तारकेश्वरी सिन्हा आणि इंदिरा गांधी यांच्यापासून प्रेरित होता.[१]
1975 film directed by Gulzar | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
निर्माता |
| ||
Performer | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
ही कथा अनेक वर्षांनंतर एका अनोळखी जोडप्याच्या भेटीवर आधारित आहे, जेव्हा पत्नी आरती देवी, आता एक आघाडीची राजकारणी असते, ती निवडणूक प्रचारादरम्यान तिच्या पतीद्वारे चालवल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये राहते. [२] गुलजार यांनी लिहिलेल्या आणि किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी गायलेल्या राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांसाठी हा चित्रपट प्रसिद्ध आहे.
सुचित्रा सेन ही बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री, जिने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते, तिने आरती देवीची प्रमुख भूमिका साकारली होती.
इंदिरा गांधी सत्तेत असताना चित्रपटाला पूर्ण योग्यरित्या प्रदर्शित होऊ दिले नाही. १९७५ च्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनी चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते असा दावा करत आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यापासून रोखले. राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेने या बंदीमध्ये आणखी भर पडली. या बंदीमुळे चित्रपट लगेच चर्चेत आला. इंदिरा गांधींचा १९७७ च्या राष्ट्रीय निवडणुकीत पराभव झाल्यावर सत्ताधारी जनता पक्षाने या चित्रपटाला सरकारी दूरदर्शनवर प्रदर्शित केले.[३] [४] अभिनेत्री सेनच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा चित्रपट ठरला, आणि तसेच तिचा शेवटचा हिंदी चित्रपटही ठरला; [३] तिने १९७८ मध्ये चित्रपटांमधून निवृत्ती घेतली. कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (समीक्षक) फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.
संदर्भ
संपादन- ^ V.Gangadhar (20 July 2001). "Where is reality?". द हिंदू. रोजी मूळ पानापासून संग्रहित2 September 2010. 27 January 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ^ Lalit Mohan Joshi 2002.
- ^ a b Chatterjee 2003, पान. 247.
- ^ Sinha, Sayoni. "Ten most controversial films". Yahoo!. 13 June 2013 रोजी पाहिले.