संजीव कुमार
संजीव कुमार या नावाने प्रसिद्ध असलेला हरी जरीवाला (जन्म : सुरत, ९ जुलै १९३८; - मुंबई, ६ नोव्हेंबर१९८५) हा हिंदी चित्रपटांमधील एक अभिनेता होता. इ.स. १९६० सालातील हम हिंदुस्तानी या हिंदी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. आँधी, खिलौना (इ.स. १९७०), मनचली (इ.स. १९७५), शोले (इ.स. १९७५), अंगूर (इ.स. १९८१), नमकीन (इ.स. १९८२) इत्यादी लोकप्रिय चित्रपटांत त्याने प्रमुख भूमिका साकारल्या.
संजीव कुमार | |
---|---|
संजीव कुमार | |
जन्म | संजीव कुमार |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
जीवन आणि पार्श्वभूमी
संपादनसंजीव कुमार यांचा जन्म गुजरातमधील सुरत येथे हरिहर जेठालाल जरीवाला (हरीभाई म्हणूनही ओळखला जातो)[१][२] म्हणून गुजराती कुटुंबात झाला. संजीवकुमारला दोन धाकटे भाऊ आणि एक बहीण आहेत. त्याचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आहे.
कारकीर्द
संपादनसंजीव कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात स्टेज अभिनेता म्हणून केली. मुंबईतल्या आयपीटीए (Indian People's Theatre Association)द्वारा त्याने भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. रंगमंच अभिनेता असल्याने त्याच्याकडे जुन्या भूमिका साकारण्याचे कौशल्य होते. वयाच्या २२ व्या वर्षी त्याने आर्थर मिलरच्या 'ऑल माय सन्स'च्या हिंदी रूपांतरित नाटकात एका म्हाताऱ्याची भूमिका केली. ए.के. हंगलदिग्दर्शित डमरू नाटकात संजीव कुमार याची सहा मुले असलेल्या ६० वर्षांच्या वृद्धाची भूमिका होती.[३]
संजीवकुमारने १९६० मध्ये हम हिंदुस्तानी या छोट्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट निशान (१९६५) होता. १९६८ मध्ये त्याने प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांवी प्रमुख भूमिका असलेल्या एका चित्रपटात भूमिका केली. १९६६ च्या कलापी या गुजराती चित्रपटात त्यांनी काम केले होते. हा चित्रपट कविता कलापी यांच्या जीवनावर आधारित होता, त्यात संजीव कुमार याची मुख्य भूमिका होती,
आरोग्य समस्या आणि मृत्यू
संपादनकुमार यांचा जन्म जन्मजात हृदयविकाराने झाला होता आणि त्याच्या कुटुंबातील बरेच लोक ५० वर्षांपर्यंत आयुष्य जगले नव्हते. पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर अमेरिकेत त्यांचा बायपास झाला. तथापि, ६ नोव्हेंबर १९८५ रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आधी त्याचा छोटा भाऊ नकुल याचा मृत्यू झाला, तर त्याचा दुसरा भाऊ किशोर सहा महिन्यांनंतर मरण पावला.[४][५] जरी तो एक वयोवृद्ध भूमिका निभावणारा अभिनेता असला तरी वयाच्या ५० व्या वर्षाआधीच त्यांचे निधन झाले.
पुरस्कार
संपादनराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - जिंकला
१९७१ दस्तक - हमीद
१९७३ कोशिष - हरीचरण[६]
संजीव कुमार यांना १४ फिल्मफेर पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आले होते, तीनदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेते म्हणून तर उर्वरित सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून.
खाली दर्शविल्याप्रमाणे त्याने दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि एकदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कार जिंकले.
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेर पुरस्कार - जिंकला
१९७६ आंधी - जे.के. १९७७ अर्जुन पंडित - अर्जुन पंडित
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेर पुरस्कार - जिंकला
१९६९ शिकार - निरीक्षक राय
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेर पुरस्कार - नामांकित
१९७१ खिलोना - विजयकमल एस. सिंह
१९७४ कोशिष - हरि चरण माथुर
१९७६ शोले - ठाकूर बलदेव सिंह
१९७७ मौसम - डॉ.अमरनाथ गिल
१९७८ ये है जिंदगी - आनंद नारायण
१९७८ जिंदगी - रघु शुक्ला
१९७९ देवता - टोनी / तरुण कुमार गुप्ता
१९७९ पती पत्नी और वो - रणजित छाधा
१९८३ अंगूर - अशोक आर. टिळक
परोपकारी
संपादनसंजीव कुमार फाउंडेशन[७] ही राष्ट्रीय पातळीवरील विकास संस्था (स्वयंसेवी संस्था) आहे. त्यांच्या कुटुबियांना प्रामुख्याने शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरण, संस्कृती आणि पोषण यावर लक्ष केंद्रित केले जाते. संजीव कुमार यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक आणि बॅकस्टेज तंत्रज्ञ यांना दरवर्षी पुरस्कार आणि रोख बक्षिसे दिली जातात.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील संजीव कुमार चे पान (इंग्लिश मजकूर)
- ^ McGlynn, Moyna (2013-06-12). "18th August: Proper 15". The Expository Times. 124 (10): 497–499. doi:10.1177/0014524613486969b. ISSN 0014-5246.
- ^ "IJCNN 2007 Program: Sunday, August 12 - Monday, August 13, 2007". 2007 International Joint Conference on Neural Networks. IEEE. 2007-08. doi:10.1109/ijcnn.2007.4370918. ISBN 9781424413799.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ McGlynn, Moyna (2013-06-12). "18th August: Proper 15". The Expository Times. 124 (10): 497–499. doi:10.1177/0014524613486969b. ISSN 0014-5246.
- ^ McGlynn, Moyna (2013-06-12). "18th August: Proper 15". The Expository Times. 124 (10): 497–499. doi:10.1177/0014524613486969b. ISSN 0014-5246.
- ^ Kumar, Sanoj; Kumar, Sanjeev; Kumar, Anuj (2018). "Histogram based motion estimation of underwater images". Author(s). doi:10.1063/1.5042200. Cite journal requires
|journal=
(सहाय्य) - ^ "Original PDF". dx.doi.org. 2019-11-06 रोजी पाहिले.
- ^ Heinrichs, Ann (2019-01-16). "LCC from August-November 2018 Lists". Theology Cataloging Bulletin. 27 (1): 7–12. doi:10.31046/tcbv27no1_530. ISSN 1548-8497.