एलिझाबेथ वॉरन

अमेरिकन राजकारणी

एलिझाबेथ ॲन वॉरन (इंग्लिश: Elizabeth Ann Warren, जन्म: २२ जून १९४९) ही एक अमेरिकन शिक्षिका, राजकारणी व विद्यमान सेनेटर आहे. १९७७ सालापासून कायदा ह्या विषयाची प्राध्यापक राहिलेल्या वॉरनने आजवर अमेरिकेतील अनेक प्रमुख विद्यापीठांमध्ये कायदाशिक्षण दिले आहे. त्याचबरोबर सामान्य ग्राहकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या वॉरनला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने ग्राहक आर्थिक संरक्षण संस्था नावाच्या सरकारी एजन्सीवर विशेष सल्लागार म्हणून नेमले. २०१२ सालच्या सेनेटरपदाच्या निवडणुकीमध्ये वॉरन मॅसेच्युसेट्स राज्यामधून सेनेटवर निवडून आली.

एलिझाबेथ वॉरन
Elizabeth Warren
एलिझाबेथ वॉरन


विद्यमान
पदग्रहण
३ जानेवारी, २०१३
एड मार्कीच्या समेत

जन्म २२ जून, १९४९ (1949-06-22) (वय: ७२)
ओक्लाहोमा सिटी, ओक्लाहोमा
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक
निवास केंब्रिज
धर्म युनायटेड मेथडिस्ट (प्रोटेस्टंट)

नोव्हेंबर २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवार हिलरी क्लिंटन उपाध्यक्षपदासाठी वॉरनची निवड करेल असा अंदाज बांधला गेला होता परंतु हिलरीने टिम केनची निवड केली.

बाह्य दुवेसंपादन करा