एच.एम. पटेल

भारतीय राजकारणी

हरीभाई मुलजीभाई पटेल (ऑगस्ट २७, इ.स. १९०४-नोव्हेंबर ३०,इ.स. १९९३) हे इंडियन सिव्हील सर्व्हीस मधून नियुक्त झालेले वरिष्ठ सनदी अधिकारी होते. वल्लभभाई पटेल गृहमंत्री असताना एच.एम.पटेल हे भारत सरकारच्या केंद्रिय गृहमंत्रालयाचे सचिव होते.सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.ते स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील धांधुका लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९७७ आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून गुजरात राज्यातीलच सांबरकाठा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्यांनी मोरारजी देसाई सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून तर चौधरी चरण सिंह सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.