उमाबाई दाभाडे
उमाबाई दाभाडे यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १७५३ झाला. मराठांच्या इतिहासात कर्तृत्त्ववान, लढवय्या स्त्रिया म्हणून उमाबाई दाभाडे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मराठा दाभाडे कुळांचे प्रमुख सदस्य होते. त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांनी त्यांना सेनापती (कमांडर इन चीफ) असे नाव दिले आणि गुजरातमध्ये अनेक प्रदेशांवर नियंत्रण ठेवले. आपल्या पती खांडेराव आणि त्यांचे पुत्र त्र्यंबक राव यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कार्यकारी अधिकार वापरले, तर त्यांच्या अल्पवयीन मुलाला यशवंत राव हे नाव देण्यात आले. बाबासाजी बाजीराव विरुद्ध पेशव्यांचा अयशस्वी बंडाचा परिणाम दाभाडे घराण्याचे पडझड झाले[१]
उमाबाई दाभाडे | |
---|---|
मृत्यू |
२८ नोव्हेंबर, इ.स. १७५३ पुणे येथील नाडगममोडी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
जोडीदार | खंडेराव दाभाडे |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
व्यक्तिगत माहिती
संपादनउमाबाई दाभाडे ही अभोणकर देवराव ठोके देशमुखांची कन्या होती. तळेगाव दाभाड्याचे खंडेराव दाभाडे हे त्यांचे पती. या जोडप्याला तीन मुलगे (त्र्यंबकराव, यशवंतराव आणि सवाई बाबुराव) आणि तीन मुली (शाहबाई, दुर्गाबाई, आणि आनंदीबाई) झाल्या. १७१० मध्ये, उमाबाईंनी नाशिकजवळ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरावर पोहोचण्यासाठी डोंगरावर ४७० पायऱ्या बांधल्या.
कामाचा विषय
संपादनदाभाडे यांचे घराणे शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांच्या सैन्यात होते. मराठ्यांच्या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या बाहेर वाढविण्याचे कार्य पहिले बाजीराव पेशवे करीत होते, तेव्हा खंडेराव दाभाडे गुजराथच्या दिशेने चढाया करीत होते. पुण्याजवळचे तळेगाव दाभाडे हे त्यांचे वतनाचे गाव असून तेथेच दाभाडे कुटुंब राहत होते. १७३१ मध्ये डभोईच्या लढाईत खंडेराव दाभाडे यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे मुलगे यशवंतराव व बळूराव हे लहान वयाचे होते. पतीच्या निधनाचे दुःख असले तरी मुलगे लहान असल्याने वतनाची जबाबदारी उमाबाईंनी अंगावर घेतली व समर्थपणे सांभाळली. केवळ दफ्तरी कामकाजच त्यांनी बघितले नाही तर सेनेचे अधिपत्य म्हणजे नेतृत्व केले. अहमदाबादच्या लढाईत स्वतः हत्यारबंद होऊन हत्तीवर बसून त्या लढाईत सहभागी झाल्या; मोठा पराक्रम केला. त्यांचा पराक्रम, वीरवृत्ती, स्त्री असूनही अंगी असणारे शौर्य बघून शाहू महाराज अतिशय प्रसन्न झाले व त्यांनी सेनापतीपद व सेना सरखेल हे विशेष अधिकार त्यांना दिले. दाभाड्यांची सरदारकी उमाबाई स्वतः चालवीत असत. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर परिस्थिती बरीच बदलून गेली. सातारच्या गादीवर आलेले छत्रपती रामराजे केवळ नामधारीच होते. सरदारमंडळी प्रबळ होऊन आपली सत्ता वाढविण्याव्या प्रयत्नांत होते. उमाबाई एक स्त्री आहेत. त्यांचे काय चालणार, त्यांचे अधिकार कमी करून त्यांचा मुलूख कमी करण्याचा प्रयत्न अनेकजण करीत होते. उमाबाई आपला मुलूख कमी करून करून देण्यास तयार नव्हत्या. नानासाहेब पेशवे सर्व कारभार बघत होते. उमाबाईंनी स्वतः त्यांच्याबरोबर बोलणी करण्याचे ठरविले. त्या एकट्याच त्यांच्या बाजूने वाटाघाटी करण्यास बसत. त्यावरूनच त्या किती धोरणी व हुशार होत्या हे दिसते. आपला मुलुख तोडून देण्याऐवजी आपल्याकडून पैसे द्यावेत, असा विचार उमाबाई ठामपणे मांडत होत्या. उमाबाई जबरदस्त ताकदीच्या मुत्सद्दी महिला होत्या. नानासाहेब पेशवे त्यांना सन्मानाने आदराची वागणूक देत असत. उमाबाईंनी आपल्या सरदारकीचे काम पतिनिधनानंतर वीस वर्षे स्वकर्तृत्वावर व जबाबदारीने सांभाळले.[२]
मृत्यू
संपादन२८ नोव्हेंबर १७५३ रोजी पुणे येथील नाडगममोडी येथे उमाबाईंचा मृत्यू झाला, तर तळेगाव दाभाडेतील "श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर" येथे त्यांची समाधी आहे.[३]
उमाबाई दाभाडे यांच्यावरील मराठी पुस्तके
संपादन- जिद्द - सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या जीवनावरील कादंबरी (मालती दांडेकर)
संदर्भ
संपादन- ^ कर्वे, स्वाती (2014). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष. p. 33. ISBN 978-81-7425-310-1.
- ^ "WikiVisually.com". wikivisually.com. 2018-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Umabai Dabhade". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2017-08-08.