ई-जीवनसत्त्व

(ई जीवनसत्त्व या पानावरून पुनर्निर्देशित)

ई-जीवनसत्त्व हे शरिराला लगणारे महत्त्वाचे जीवनसत्त्व असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही. हे रक्तात लाल रक्त कोशिका व पेशिभित्तिका बनवण्यासाठी उपयोगी असते. हे विटामिन शरीरातील अनेक भागांना सामान्य बनविण्यात मदत करते. जसे की मांसपेशी, स्नायू व इतर पेशींचे कार्य. विटामिन ई फॅटी आम्लाचे संतुलन ठेवण्यात ही महत्त्वपूर्ण आहे. नवजात शिशु मध्ये विटामिनच्या कमतरतेमुळे रक्ताची कमी होते त्यामुळे त्यांच्यात पंडुरोग होतो.[][]

ई-जीवनसत्त्व
Drug class
The α-tocopherol form of vitamin E
Class identifiers
ATC संकेतांक A11H
Biological target Reactive oxygen species
Clinical data
Drugs.com MedFacts Natural Products
External links
वैद्यकीय विषय मथळा D014810
In Wikidata

विटामिन ई, सेलच्या अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या बाहरी कवच किंवा सेल मेमब्रेनला टिकून ठेवतो. विटामिन ई, शरीरच्या फैटी एसिडला ही संतुिलत ठेवतो.

वेळेच्या आदि जन्मलेल्या किंवा प्रीमेच्योर नवजात शिशु (Premature infants) मध्ये विटामिन ईच्या कमतरतेमुळे रक्ताची कमी होते. या मुळे त्यांच्यात रक्ताल्पता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलांमध्ये,वयस्क लोकांमध्ये विटामिन ईच्या अभावाने मेंदूच्या किंवा डोक्यातील नसांचे किंवा न्युरोलोजीकल (neurological) समस्या येऊ शकते. अत्यधिक विटामिन ई घेतल्या ने रक्तातील सेलवर प्रभाव पडू शकतो ज्या मुळे रक्त वाहने किंवा बीमारी होण्याची शक्यता असते. याला टोकोफेरोल असेही नाव आहे.

वनस्पती बिया, सुका मेवा, तेलबिया, पीनट बटर, वनस्पती तेल, हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन ई-समृद्ध पदार्थ यांचा समावेश होतो. तर मांसाहारी पदार्थात यकृत, अंड्यातील पिवळा बलक, वगैरेंमध्ये ई जीवनसत्त्व असते.[][]

कमतरतेचे दुष्परिणाम

संपादन

वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन, वृषणी ऱ्हास (??). .

अतिरेकाचे परिणाम

संपादन

ई जीवनसत्त्वाच्या गोळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्यास काही वर्षांनंतर वाढता रक्तदाब, डोकेदुखी, डोळे कमजोर होणे अशा आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

हे सुद्धा पहा

संपादन
  1. अ-जीवनसत्त्व
  2. ब-जीवनसत्त्व
  3. क-जीवनसत्त्व
  4. ड-जीवनसत्त्व
  5. के-जीवनसत्त्व

संदर्भ

संपादन
  1. ^ a b Traber MG, Bruno RS (2020). "Vitamin E". In Marriott BP, Birt DF, Stallings VA, Yates AA (eds.). Present knowledge in nutrition, eleventh edition. London, United Kingdom: Academic Press (Elsevier). pp. 115–36. ISBN 978-0-323-66162-1.
  2. ^ a b "Vitamin E". Micronutrient Information Center, Linus Pauling Institute, Oregon State University. October 2015. 3 August 2019 रोजी पाहिले.