इंडियन ऑइल कॉर्पोरेशन
(इंडियन ऑइल या पानावरून पुनर्निर्देशित)
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (बीएसई.: 530965, एनएसई.: IOC) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली इंडियन ऑइल महसूलानुसार देशातील सर्वात मोठी तर जगातील ८८वी मोठी कंपनी आहे. भारतामध्ये पुरवली जाणारी ४९ टक्के खनिज तेल उत्पादने इंडियन ऑइल व तिच्या पाल्य कंपन्यांतर्फे बनवण्यात येतात.
प्रकार | सरकारी कंपनी |
---|---|
संक्षेप |
बी.एस.ई.: 530965 एन.एस.ई.: IOC |
उद्योग क्षेत्र | तेल व वायू |
स्थापना | इ.स. १९६४ |
मुख्यालय | नवी दिल्ली, भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती | आर. एस. बुटोला |
उत्पादने | पेट्रोलियम, इंधन |
महसूली उत्पन्न | ▲ $ ७६.०५ अब्ज |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | ▲ $ ३.३० अब्ज |
मालक | भारत सरकार |
कर्मचारी | ३६,१९८ (मार्च २०१३) |
संकेतस्थळ | www.iocl.com |
सध्या भारतभर इंडियन ऑइलचे २०,५७५ पेट्रोल पंप तर एल.पी.जी. सिलेंडर पुरवणारे ५,९३४ वितरक आहेत.