आशा पाटील

भारतीय अभिनेत्री


आशा पाटील (इ.स. १९३६ - १८ जानेवारी, इ.स. २०१६) या एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री होत्या. त्या मूळच्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावच्या होत्या.

आशा पाटील यांनी दादा कोंडके, अनंत माने आणि यशवंत भालकर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या आई आणि मावशीच्या भूमिका साकारल्या. याआधी अशा भूमिकांमध्ये रत्नमाला दिसत. त्यांनी १५०हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांत कामे केली. आशा पाटील यांनी विनोदी भूमिकांबरोबर दुःखाशी संघर्ष करणारी माय अशाही भूमिका साकारल्या. डॉ. काशीनाथ घाणेकर, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, विक्रम गोखले, अलका कुबल, प्रिया अरुण, वर्षा उसगावकर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते.

१९६० साली अंतरीचा दिवा या माधव शिंदे दिग्दर्शित चित्रपटामधून आशा पाटील यांनी साहाय्यक अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नंतर त्यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या तो मी नव्हेच या नाटकातही काम केले. या नाटकातील त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली होती. ’एकच प्याला’च्या काही प्रयोगांतही त्या होत्या.

चित्रपटांतील भूमिकांबद्दल त्यांना उत्कृष्ट अभिनयाची अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

अवघ्या चित्रपटसृष्टीची 'आई'

संपादन

चित्रपटांमधून आईची भूमिका साकारणाऱ्या आशाताई पाटील अवघ्या मराठी चित्रपट सृष्टीत आई म्हणूनच ओळखल्या जात होत्या. त्या उत्स्फूर्त अभिनय आणि लक्ष्यवेधी संवादफेकीसाठी ओखळक्या जायच्या.[ संदर्भ हवा ] त्या वैयक्तिक आयुष्यात साधेपणाने रहात. कौटुंबिकदृष्ट्या खडतर केलेल्या पाटील अखेरची दीड वर्षे कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमात राहावे लागले. मणका आणि किडनीचा त्रास असलेल्या आशा पाटील आयुष्याचे शेवटचे सहा महिने त्यांची कन्या तेजस्विनी भंडारी यांच्याकडे रहात होत्या.

चित्रपट

संपादन
  • अंतरीचा दिवा
  • आयत्या बिळावर
  • उतावळा नवरा
  • करावं तसं भरावं
  • कामापुरता मामा
  • गावरान गंगू
  • घे भरारी
  • चांडाळ चौकडी
  • तुमचं आमचं जमलं
  • निवृत्ती ज्ञानदेव
  • पदराच्या सावलीत
  • पळवा पळवी
  • पुत्रवती
  • प्रीतिविवाह
  • बन्याबापू
  • बोट लावीन तिथं गुदगुल्या
  • मंत्र्याची सून
  • माणसाला पंख असतात
  • माहेरची पाहुणी
  • माहेरची साडी
  • रंगल्या रात्री अशा
  • राम राम गंगाराम
  • वाजवू का
  • शाहीर परशुराम
  • शुभ बोल नाऱ्या
  • साधी माणसं
  • सामना
  • सासरचं धोतर
  • सासुरवा्शीण
  • सुळावरची पोळी
  • सोयरीक
  • हृदयस्पर्शी

पुरस्कार

संपादन

त्यांच्या अभिनयाची दखल घेत सरकारने विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.