रत्नमाला (अभिनेत्री)
रत्नमाला (१९२४ - २४ जानेवारी १९८९) ह्या एक भारतीय चित्रपट सृष्टीतील महिला अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका निभावल्या होत्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे दादा कोंडकेच्या आई म्हणून त्या ओळखल्या जात असत. याचे मुख्य कारण म्हणजे दादा कोंडकेच्या प्रत्येक चित्रपटात रत्नमाला ह्या त्यांच्या आईची भूमिका पार पाडत असत.
कमल भिवंडकर | |
---|---|
जन्म |
रत्नमाला १९२४ महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | २४ जानेवारी १९८९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | १९३८- १९८९ |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | रुख्मिणी स्वयंवर(१९४६), माझा राम (१९४९), गोकुळचा राजा (१९५०), रामराम पवना (१९५०), सांगते आयका (१९५९), मानिनी (१९६१), कोर्टाची पायरी (१९७०), रंगपंचमी (१९७१), काली बायको (१९७०) ), मुंबईचा जावई (१९७०) |
पती | राजा पंडित |
त्यांचे मूळ नाव कमल भिवंडकर असे होते. तर त्यांच्या पतीचे नाव राजा पंडित होते.[१] त्यांनी सर्वप्रथम इ.स. १९३८ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी भगवा झेंडा या मराठी चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या वेळी त्यांचे नाव कमल भिवंडकर पासून रत्नमालाबाई असे बदलण्यात आले. त्यानंतर प्रथमच त्यांनी ‘'माझी लाडकी’' (१९३९) या चित्रपटात नायिकेची भूमिका निभावली. तर ‘'स्टेशन मास्तर’' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.[१]
चित्रपट
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b "Ratnamala". Cinemazzi. 2024-04-26 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनइंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रत्नमाला (अभिनेत्री) चे पान (इंग्लिश मजकूर)
- चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार Archived 2021-09-07 at the Wayback Machine.