Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

यशवंत लक्ष्मण भालकर (जन्म : कोल्हापूर, १७ एप्रिल १९५७, मृत्यू: कोल्हापूर, १९ डिसेंबर २०१८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक व लेखक होते. ते कोल्हापूरला रहात. ते मराठी चित्रपट महामंडळाचे सतत दोन वर्षे अध्यक्ष होते. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी काही (सुमारे ६) माहितीपटांचे दिग्दर्शनही केले होते.

भालकरांना कुटुंबाकडूनच चित्रपट विश्वात काम करण्यास प्रोत्साहन मिळाले होते. जयप्रभा स्टुडिओत भालजी पेंढारकर यांच्या तालमीत ते तयार झाले. उमेदवारीच्या काळात स्टुडिओमध्ये भालकरांनी पडेल ती कामे केली. यशवंत भालकरांनी कोल्हापुरातला छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेला आणि भालजी पेंढारकरांनी नावारूपास आणलेला जयप्रभा फिल्म स्टुडिओ विकला जाण्यापासून वाचवला.

शालिनी सिनेटोनच्या दोन भूखंडांवर हात मारण्याचा डाव महापालिकेतील कारभारी नगरसेवक आणि विकासकांनी संगनमताने आखला होता. तो हाणून पाडण्याला यशवंत भालकरांनी प्रचंड खटपट केली. शेवटी कोल्हापूर महापालिकेने स्टुडिओच्या जागेवरील बांधकामाच्या दिलेल्या आदेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५-१२-२०१८ रोजी स्थगिती दिल्याने विकसकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले. हा स्टुडिओ कोल्हापूरच्या राजभगिनी अक्कासाहेब महाराज यांनी रंकाळा तलावाच्या निसर्गरम्य परिसरात ४७ एकरात स्थापन केला होता. रोज रंकाळा तलावावर फिरायला जाणाऱ्या भालकरांनी तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आयुष्यभर खटपट केली. भालेकर काही काळ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवरही होते.

यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट (एकूण १३हून अधिक)संपादन करा

 • घे भरारी
 • डाळिंबी (साहाय्यक दिग्दर्शक) (१९८१)
 • नाथा पुरे आता (२००६)
 • पैज लग्नाची (१९९७)
 • राजमाता जिजाऊ (२०११)
 • राजा पंढरिचा
 • लेक लाडकी (२०१३)
 • हाय कमांड

यशवंत भालेकरांनी भूमिका केलेले चित्रपटसंपादन करा

 • तांबडी माती (बालकलाकार)
 • सोंगाड्या (बालकलाकार)

यशवंत भालकर यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

 • पडद्यामागचा सिनेमा (अभिनंदन प्रकाशन)
 • मला भेटलेली मोठी माणसं (व्यक्तिचित्रणे)
 • लामणदिवा (आठवणी, कथा - अभिनंदन प्रकाशन)

पुरस्कारसंपादन करा

 • यशवंत भालकर यांच्या 'पैज लग्नाची' या चित्रपटाला १४ राज्य पुरस्कार मिळाले होते
 • त्यांच्या 'घे भरारी' या चित्रपटाला ५ व्ही. शांताराम पुरस्कार मिळाले होते.
 • राजा पंढरिचा या चित्रपटाला महाराष्ट्र सरकारचे ३ पुरस्कार मिळाले होते.

संदर्भसंपादन करा