आयडर नदी ही जर्मनीतील श्लेसविग-होल्स्टाइन राज्यातून वाहणारी सर्वाधिक लांबीची नदी आहे. वाटेनबेकजवळ उगम पावलेली आयडर कील शहराजवळ बाल्टिक समुद्राच्या अगदी जवळ जाते पण तेथून पश्चिमेला वळण घेऊन उत्तर समुद्रास मिळते.

आयडर नदी
EiderbeiTönning.JPG
ट्यॉनिंग गावानजीक आयडर नदीचे दृश्य
उगम वाटनबेक
मुख उत्तर समुद्र (ट्यॉनिंग नजीक)
पाणलोट क्षेत्रामधील देश जर्मनी: श्लेसविग-होल्स्टाइन
लांबी १८८ किमी (११७ मैल)
उगम स्थान उंची ३० मी (९८ फूट)
सरासरी प्रवाह ६.५ घन मी/से (२३० घन फूट/से)

आयडर नदीचा काही भाग कील कालव्यात समाविष्ट आहे.

अनेक शतके ही नदी डेन्मार्क आणि पवित्र रोमन साम्राज्यांमधील सीमा होती.