असामोआह ग्यान
असामोआह ग्यान (Asamoah Gyan; २२ नोव्हेंबर १९८५ , आक्रा) हा घाना देशाचा एक फुटबॉलपटू आहे. २००३ पासून घाना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला ग्यान २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये घानाकडून खेळला आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/15/Asamoah_Gyan_Rennes_081231.jpg/250px-Asamoah_Gyan_Rennes_081231.jpg)
क्लब पातळीवर ग्यान २००३-०८ दरम्यान इटलीच्या सेरी आमधील उदिनेस काल्सियो, २००८-१० दरम्यान फ्रान्सच्या लीग १ मधील स्ताद ऱ्हेन एफ.सी., २०१०-१२ दरम्यान प्रीमियर लीगमधील संडरलॅंड ए.एफ.सी. तर २०१२ पासून संयुक्त अरब अमिरातीच्या अल ऐन ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
संपादन- माहिती Archived 2014-07-09 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत