अश्रफ घनी

अफगानिस्तानचे माजी राष्ट्रपती

अश्रफ घनी अहमदझाई (पश्तो: اشرف غني احمدزی; फारसी: اشرف غنی احمدزی; १९४९) हे अफगाणिस्तान देशाचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष होय. सप्टेंबर २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये अपक्ष घनी विजय मिळवून राष्ट्राध्यक्षपदावर आले. ह्यापूर्वी २००२ ते २००४ दरम्यान घनी अफगाणिस्तानचे अर्थमंत्री होते. १५ ऑगस्ट, २०२१ रोजी तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यावर घनी अज्ञान ठिकाणी परागंदा झाले.

अश्रफ घनी

अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान देशाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ सप्टेंबर, २०१४ – १५ ऑगस्ट, २०२१
पंतप्रधान अब्दुल्ला अब्दुल्ला
मागील हमीद करझाई

कार्यकाळ
२२ डिसेंबर २००४ – २१ डिसेंबर २००८

अफगाणिस्तानचा अर्थमंत्री
कार्यकाळ
२ जून २००२ – १४ डिसेंबर २००४
राष्ट्रपती हमीद करझाई

जन्म इ.स. १९४९
लोगर प्रांत
गुरुकुल कोलंबिया विद्यापीठ
धर्म इस्लाम

बैरूत येथे पदवीचे तर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलेल्या घनींनी १९९१ साली जागतिक बँकेमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानमधील तालिबानच्या पाडावानंतर घनींनी संयुक्त राष्ट्रांच्या विनंतीवरून अफगाणिस्तानमधील सत्तांतरासाठी झालेल्या बॉन करारामध्ये विशेष सल्लागार म्हणून काम पाहिले.

डिसेंबर २००१ मध्ये घनी अफगाणिस्तानात परतले व त्यांनी हमीद करझाईच्या मंत्रीमंडळामध्ये अर्थमंत्र्याचे पद स्वीकारले. ह्या पदावर असताना घनी आशियामधील सर्वोत्तम अर्थमंत्री मानला जात असे. २००४ मध्ये घनींनी राजकारण सोडून काबुल विद्यापीठाचा कुलगुरू बनण्याचे ठरवले व पुढील ४ वर्षे ते ह्या पदावर राहिले. २००९ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये पराभव पत्कारल्यानंतर घनींनी २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला.

सध्या घनी जगातील सर्वोत्तम विचारवंतांपैकी एक मानले जातात.[ संदर्भ हवा ] ते संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमाच्या गरिबी निर्मूलन उपक्रमासह अनेक जागतिक प्रकल्पांमध्ये कार्यशील आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन