प्रा. अशोक बागवे (मार्च १०, इ.स. १९५२ - हयात) हे मराठी भाषेतील कवी आहेत.

अशोक बागवे
जन्म मार्च १०, इ.स. १९५२
कार्यक्षेत्र अध्यापन, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

बागव्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले आहे. ते ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालय येथे अध्यापनाचे काम करत.

प्रकाशित साहित्य

संपादन

अशोक बागवे ह्यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कवितासंग्रह

संपादन
  • कविता दशकाची (इ.स. १९८० ग्रंथाली प्रकाशन)
  • आलम (इ.स. १९८२ मौज प्रकाशन)
  • आज इसवीसन ताजे टवटवीत वगैरे (इ.स. १९९७ ग्रंथाली प्रकाशन)
  • गर्द निळा गगनझुला (इ.स. २००० नितांत प्रकाशन)
  • कवितांच्या गावा जावे[] (३१ जुलै, इ.स. २००१)

अशोक बागवे यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य ना. घ. देशपांडे पुरस्कार (२०१५)

संदर्भ

संपादन
  1. ^ 'कवितांच्या गावा जावे' हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.