अरुण म्हात्रे

मराठी भाषेतील कवी, गीतकार व निवेदक

अरुण म्हात्रे (जन्म : मुंबई, ऑक्टोबर २५, इ.स. १९५४) हे मराठी भाषेतील कवी, गीतकार आणि निवेदक आहेत.

अरुण म्हात्रे
जन्म ऑक्टोबर २५, इ.स. १९५४
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

जीवन संपादन

अरुण म्हात्रे यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले.

प्रकाशित साहित्य संपादन

अरुण म्हात्रे ह्यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कवितासंग्रह संपादन

  • ऋतू शहरातले (इ.स. १९९०)
  • कवितांच्या गावा जावे[१] (३१ जुलै, इ.स. २००१)
  • कोसो मैल दूर आहे चांदणी (कवितासंग्रह)
  • ते दिवस आता कुठे (कवितासंग्रह)
  • प्रिय भिमास ... (कवितासंग्रह)

गीते संपादन

  • उंच माझा झोका (याच नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेचे शीर्षकगीत; संगीत - निलेश मोहरीर; गायिका - जान्हवी प्रभू-अरोरा)
  • मार्ग लाभो पावलांना ('उंच माझा झोका' या दूरचित्रवाणी मालिकेतल्या एका भागात आलेले प्रार्थना गीत, संगीत - निलेश मोहरीर; गायिका - जान्हवी प्रभू-अरोरा)

संदर्भ संपादन

  1. ^ 'कवितांच्या गावा जावे' हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.