अवंतिका एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरसोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रलइंदूर स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते इंदूर दरम्यानचे ८२९ किमी अंतर १४ तासांत पूर्ण करते. ह्या गाडीला उज्जैन ह्या ऐतिहासिक शहराचे अवंतिका हे प्राचीन नाव दिले गेले आहे.

अवंतिका एक्सप्रेसचा फलक
अवंतिका एक्सप्रेसचा मार्ग

मुंबई ते इंदूरदरम्यानचा संपूर्ण मार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन अवंतिका एक्सप्रेससाठी वापरले जाते.

या ट्रेन ला 1 प्रथम श्रेणी वातानुकूलित, 2 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 5 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 12 श्ययन यान, 4 सामान्य वर्ग, अश्या एकूण 24 बोगी असतात. वेळेनुसार अति अवजड पार्सल वाहन देखील कधी कधी राहाते. भारतीय रेल्वे प्रवाश्यांच्या मागणीनुसार रेल्वे च्या अधिकारात सेवेत बदल करते.[]

दर दिवशी चालणारी ही ट्रेन आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रल ते इंदूर हे 829 किमी अंतर 13 तास आणि 55 मी. मध्ये सरासरी तासी वेग 59.57 किमी ठेवून पोहचते आणि परतीचा प्रवास तासी वेग सरासरी 60.29 किमी ठेवून 13 तास 45 मी.पोहचते.[]

5-2-2012 रोजी या रेल्वे मार्गाचे DC इलेक्ट्रिक मधून AC मध्ये रूपांतर झाल्याने वडोदरा येथील WAP 4ई या रेल्वे इंजींनचे मदतीने ही ट्रेन धावते.[]

तपशील

संपादन

वेळापत्रक

संपादन
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२९६१ मुंबई सेंट्रल – इंदूर १९:०५ ०९:०० रोज
१२९६२ इंदूर – मुंबई सेंट्रल १६:२५ ०६:१० रोज

मार्ग

संपादन
क्रम स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
BCT मुंबई सेंट्रल
BVI बोरिवली ३०
BL वलसाड १९४
NVS नवसारी २३०
ST सुरत २६३
AKV अंकलेश्वर ३१२
BH भरूच ३२२
BRC वडोदरा ३९२
GDA गोधरा ४६५
१० DHD दाहोद ५४०
११ MGN मेघनगर ५७३
१२ THDR थांडला ५८१
१३ BMI बाम्निया ६०८
१४ RTM रतलाम ६५३
१५ KUH खाचरोद ६८१
१६ NAD नागदा ६९५
१७ UJN उज्जैन ७५०
१८ DWX देवास ७९०
१९ INDB इंदूर ८२९

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "अवंतिका एक्ष्प्रेस्स" (इंग्लिश भाषेत). ०७ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "अवंतिका एक्ष्प्रेस्स (१२९६१ ) मार्गावरील स्थानके" (इंग्लिश भाषेत). 2015-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०७ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "मार्ग व वेळापत्रक" (इंग्लिश भाषेत). ०७ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन