अर्शद वारसी

भारतीय चित्रपट अभिनेता, कोरिओग्राफर आणि निर्माता (जन्म १९६६)
(अरशद वारसी या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्शद वारसी (१९ एप्रिल १९६८) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता, नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक आहे. तो प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. विविध शैलींमधील अभिनय आणि विनोदी भूमिकांसाठी अर्शद प्रसिद्ध आहे. मुन्ना भाई एमबीबीएस (२००३) आणि त्याचा उत्तरभाग लगे रहो मुन्ना भाई (२००६) या विनोदी चित्रपटांतील त्याची सर्किटची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली. सर्किटची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील एक परिवर्तन बिंदू (टर्निंग पॉइंट) मानला जातो. या भूमिकेसाठी त्याला विनोदी भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला.

अर्शद वारसी
अर्शद वारसी (२०१०)
जन्म १९ एप्रिल, १९६८ (1968-04-19) (वय: ५६)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, पार्श्वगायक, निर्माता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९६ - चालू
पत्नी मारिया गोरेटी

अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी अर्षदने काश (१९८७) मध्ये महेश भट्ट यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आणि रूप की रानी चोरों का राजा (१९९३) मधील गाण्याचे नृत्यदिग्दर्शन देखील केले. वारसीने १९९६ मध्ये "तेरे मेरे सपने" मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले; हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला. होगी प्यार की जीत (१९९९), हलचल (२००४), मैने प्यार क्यूं किया?(२००५), सलाम नमस्ते (२००५), गोलमाल: फन अनलिमिटेड (२००६), धमाल (२००७), क्रेझी ४ (२००८), गोलमाल रिटर्न्स (२००८), इश्किया (२०१०), गोलमाल ३ (२०१०), FALTU (२०११), डबल धमाल (२०११), जॉली एलएलबी (२०१३), गोलमाल अगेन (२०१७) आणि टोटल धमाल (२०१९) यांसह अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी विनोदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले. सेहर (२००५), काबुल एक्सप्रेस (२००६), देह इश्किया (२०१४) आणि गुड्डू रंगीला (२०१५) यांसारख्या चित्रपटांमधील कामांसाठी त्याची समीक्षकांनी प्रशंसा केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त अंडररेटेड[मराठी शब्द सुचवा] अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्याला अनेकांनी मानले आहे.

चित्रपटांमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त, वारसीने २००१ मध्ये नृत्यकार्यक्रम रॅझमटाझ, २००४ मध्ये सबसे फेव्हरेट कौन आणि रिअॅलिटी दूरदर्शन कार्यक्रम बिग बॉसच्या पहिल्या भागाचे सूत्रसंचालन केले आहे, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. करिश्मा - द मिरॅकल्स ऑफ डेस्टिनी (२००३) या टीव्ही मालिकेत त्याने करिश्मा कपूरसोबत भूमिका केली आणि २०१० मध्ये जरा नचके दिखा साठी पंच म्हणून काम केले.

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन