अरवली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही रांग मुख्यत्वे उत्तर गुजरात, राजस्थानच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात पसरली आहे.

अरवली पर्वतरांग दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा
राजस्थानातील अरवलीच्या टेकड्या
Disambig-dark.svg

भूविज्ञानसंपादन करा

जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरवलीचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या हा पर्वत महत्त्वाचा आहे. अंदाजे 600 ते 3500 कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली.

राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील माउंट अबू (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाणही आहे.

पर्यावरणसंपादन करा

हा पर्वत राजस्थानकडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरवली पर्वताच्या पूर्व भागात बर्‍यापैकी पाऊस पडतो मात्र अरवलीच्या पर्ज्यन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून येथे वन्य जीववैविध्य असून वन्यजीवांची संख्या लक्षणीय आहे. रणथंभोर, सारिस्का ही काही प्रसिद्ध अभयारण्य अरवली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरे (उदा. उदयपूर, चित्तोडगढ, जयपूर, सवाई माधोपुर) अरवली पर्वताच्या सानिध्यात येतात.

प्राचीन साहित्यातील उल्लेखसंपादन करा

महाभारतातील मत्स्य देश हा अरवली पर्वतरागांमध्ये असल्याचे मानले जाते.