अमृता पवार (१५ डिसेंबर १९८८) ही एक मराठी अभिनेत्री आहे. अमृता मुख्यतः मराठी दूरचित्रवाणी वरील दुहेरी, ललित २०५, स्वराज्य जननी जिजामाता, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! आदी मालिकांमध्ये काम करणारी प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.[]

अमृता पवार
जन्म १५ डिसेंबर, १९८८ (1988-12-15) (वय: ३५)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१६ ते आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!,

स्वराज्य जननी जिजामाता
पती
नील पाटील (ल. २०२२)

जन्म आणि प्रारंभिक जीवन

संपादन

अमृता पवार हिचा जन्म १५ डिसेंबर १९८८ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव रामभाऊ पवार आणि आईचे नाव रेश्मा पवार आहे. तिला शार्दुल पवार नावाचा भाऊ आहे. तिचे शालेय शिक्षण मुंबईतील विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयात झाले आणि आर.ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स कॉलेज. दूरचित्रवाणी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अमृता एका सीएच्या खाली अकाउंटंट म्हणून काम करत होती.[]

कारकीर्द

संपादन

पवार यांनी अभिनेत्री म्हणून २०१६ मध्ये स्टार प्रवाहवर प्रसारित झालेल्या दुहेरी या मराठी दूरचित्रवाणी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर ती ललित २०५ या मराठी मालिकेत भैरवीच्या भूमिकेत दिसली. तिने २०१८ मध्ये ये रे ये रे १९ या नृत्य कार्यक्रमात भाग घेतला. २०१९ वर्षी तिने सोनी मराठीवर स्वराज्य जननी जिजामाता या ऐतिहासिक मालिकेत जिजामातेची भूमिका साकारली. झी मराठीवर २०२१ मध्ये प्रसारित होणाऱ्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली.

अभिनय सूची

संपादन
वर्ष शीर्षक भूमिका वाहिनी
२०१६-२०१८ दुहेरी नेहा स्टार प्रवाह
२०१८-२०१९ ललित २०५ भैरवी
२०१९-२०२० स्वराज्य जननी जिजामाता जिजामाता सोनी मराठी
२०२०-२०२१ जिगरबाज डॉ. अदिती
२०२१-२०२२ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! अदिती देशमुख झी मराठी

संदर्भ

संपादन
  1. ^ "Amruta Pawar on being a part of Tuzhya Mazhya Sansarala Aani Kay Hava: Glad to be playing the role of my age this time - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-04-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'तुझ्या माझ्या संसाराला...'मधील या अभिनेत्रीला व्हायचं होतं सीए मात्र झाली..." न्यूझ १८ लोकमत. 2022-02-02. 2022-04-24 रोजी पाहिले.