हिंदू पंचांगात दाखविलेला अमृतयोग हा नक्षत्र आणि आणि वार यांच्या संयोगाने होतो.

अमृतयोग हा सामान्यत: सर्व कार्यास शुभ योग असतो. मात्र काही अमृत योग ठरावीक कार्यास वर्ज्य असतात. उदा०

  • गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास, त्या दिवशी अमृतयोग असला तरी हा दिवस विवाहास वर्ज्य असतो.
  • शनिवारी रोहिणी नक्षत्र असल्यास, त्या दिवशी अमृतयोग असला तरी हा दिवस प्रयाणास वर्ज्य असतो.
  • मंगळवारी आश्विनी नक्षत्र असल्यास, त्या दिवशी अमृतयोग असला तरी हा दिवस गृहप्रवेशा वर्ज्य असतो.