अमर अकबर अॅन्थनी
१९७७ हिंदी चित्रपट
(अमर अकबर ॲन्थनी या पानावरून पुनर्निर्देशित)
अमर अकबर ॲन्थनी हा १९७७ मधील भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शक व निर्माता मनमोहन देसाई आहेत. ह्यात विनोद खन्ना, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन, शबाना आझमी, नीतू सिंह, परवीन बाबी, निरुपा रॉय, प्राण, आणि जीवन प्रमुख भूमिकेत आहेत.
अमर अकबर अॅन्थनी | |
---|---|
दिग्दर्शन | मनमोहन देसाई |
निर्मिती | मनमोहन देसाई |
प्रमुख कलाकार |
विनोद खन्ना ऋषी कपूर अमिताभ बच्चन शबाना आझमी नीतू सिंह परवीन बाबी निरुपा रॉय प्राण जीवन |
छाया | पीटर परेरा |
गीते | आनंद बक्षी |
संगीत | लक्ष्मीकांत प्यारेलाल |
पार्श्वगायन |
मोहम्मद रफी किशोर कुमार लता मंगेशकर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २७ मे १९७७ |
कथानकसंपादन करा
तीन भाऊ लहानपणी रॉबर्ट नावाच्या (जीवन) एका गुन्हेगारामुळे वेगळे होतात आणि त्यांना तीन वेगळ्या धर्मांची कुटुंबं दत्तक घेतात. बावीस वर्षांनंतर, ते वेगळ्या धर्मांचे दाखवले जातात: पहिला भाऊ अमर खन्ना (विनोद खन्ना) नावाचा हिंदु पोलीस-ऑफीसर असतो, दुसरा भाऊ अकबर इलाहाबादी (ऋषी कपूर) नावाचा मुस्लिम कव्वाली-गायक असतो, आणि तिसरा भाऊ ॲन्थनी गोंजाल्विस (अमिताभ बच्चन) नावाचा ख्रिश्चन दारू-विक्रेता असतो. ते तिघं कसे तरी एकमेकांना परत भेटतात व रॉबर्टचा बदला घ्यायचा ठरवतात.
कलाकारसंपादन करा
- विनोद खन्ना - अमर खन्ना
- ऋषी कपूर - अकबर इलाहाबादी
- अमिताभ बच्चन - ॲन्थनी गोंजाल्विस
- शबाना आझमी - लक्ष्मी
- नीतू सिंह - सलमा
- परवीन बाबी - जैनी
- निरुपा रॉय - भारती
- प्राण - किशनलाल
- जीवन - रॉबर्ट
- कमल कपूर - सुपरईंटेंडेंट खन्ना (अमरचे दत्तक बाबा)
- शिवराज - श्री. इलाहाबादी (अकबरचे दत्तक बाबा)
- नासिर हुसेन - फादर गोंजाल्विस (ॲन्थनीचे दत्तक बाबा)
- युसुफ खान - जेबिस्को (जैनीचा बॉडीगार्ड)
- रंजीत बेदी - रंजीत (लक्ष्मीचा दुष्ट सावत्र-भाऊ)
पुरस्कारसंपादन करा
फिल्मफेअर पुरस्कारसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील अमर अकबर अॅन्थनी चे पान (इंग्लिश मजकूर)