विनोद खन्ना

भारतीय राजकारणी

विनोद खन्ना (पंजाबी: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; रोमन लिपी: Vinod Khanna) (६ ऑक्टोबर इ.स. १९४६ - २७ एप्रिल इ.स. २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली मन का मीत या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एकूण १३७ चित्रपटांपैकी लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, मेरा गांव मेरा देश, कच्चे धागे, अचानक (इ.स. १९७३), परवरिश (इ.स. १९७७), अमर अकबर अ‍ॅन्थनी (इ.स. १९७७), मुकद्दर का सिकंदर (इ.स. १९७८), द बर्निंग ट्रेन (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.

विनोद खन्ना
जन्म ६ ऑक्टोबर, इ.स. १९४६
पेशावर, ब्रिटिश भारत
मृत्यू २७ एप्रिल इ.स. २०१७[१]
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, राजकारण
कारकीर्दीचा काळ इ.स. १९६८ - इ.स. २०१७
भाषा हिंदी; पंजाबी
प्रमुख चित्रपट लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, अमर-अकबर-एंथनी, मेरा गांव मेरा देश, मुकद्दर का सिकंदर, कच्चे धागे
पत्नी गीतांजली (इ.स. १९७१ - ८५ घटस्फोट)
कविता (इ.स. १९९० - २०१७)
अपत्ये २ मुले - राहुल खन्ना, अक्षय खन्ना
२ मुली - साक्षी खन्ना, श्रद्धा खन्ना

संन्यास आणि पुनरागमनसंपादन करा

विनोद खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना चित्रपट सृष्टीतून अचानक निवृत्ती घेतली व आचार्य रजनीश यांचे शिष्यत्व पत्करले. साधारण ५ वर्षे ओशो रजनीश यांच्या आश्रमात संन्यास घेतल्यावर १९८७ मध्ये विनोद खन्ना यांनी पुनश्च चित्रपट सृष्टीत पुनरागमन केले. डिम्पल कपाडिया यांच्या बरोबर इन्साफ चित्रपट करून त्यांचे पुनरागमन झाले. 'जुर्म' , 'चांदनी', 'दयावान 'असे काही अतिशय गाजलेले चित्रपट या दुसऱ्या सत्रात विनोद खन्ना यांनी गाजवले.

राजकीय कारकीर्दसंपादन करा

विनोद खन्ना पंजाबातील गुरुदासपूर मतदारसंघातून बाराव्या (इ.स. १९९८), तेराव्या (इ.स. १९९९) व चौदाव्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले. जुलै, इ.स. २००२ मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.

निधनसंपादन करा

विनोद खन्ना यांचे निधन मुंबईत रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात २७ एप्रिल इ.स. २०१७ रोजी झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती अंत्ययात्रेत सहभागी झाले.[२]

पुरस्कारसंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "Actor Vinod Khanna dead at 70, he was suffering from cancer" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ महाराष्ट्र टाइम्स दि.२७/०४/२०१७[मृत दुवा]
  3. ^ "विनोद खन्ना को दादा साहब फाल्के पुरस्कार". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. जाने-माने दिवंगत अभिनेता और भारतीय जनता पार्टी के सांसद रहे विनोद खन्ना को दादा साहब फाल्के पुरस्कार से नवाज़ा गया है. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवेसंपादन करा