हखामनी साम्राज्य

(अखमेनिद राजघराणे या पानावरून पुनर्निर्देशित)

हखामनी साम्राज्य (फारसी: هخامنشیان, हखामनिशिए) हे प्राचीन इराणातून अर्थात पर्शियातून उभे राहिलेले व पुढे उत्तर आफ्रिका, भूमध्य सागरी प्रदेश, तुर्कस्तानापासून पूर्वेकडे पंजाबापर्यंत पसरलेले मोठे साम्राज्य होते. सुमारे इ.स.पू. ५५० ते इ.स.पू. ३३० या कालखंडात हे साम्राज्य अस्तित्वात होते. महान कुरुशाने हे साम्राज्य उभारले. तिसरा दारियुश या हखामनी सम्राटाला मॅसिडोनियाचा सम्राट महान सिकंदर याने हरवल्यानंतर हखामनी साम्राज्य दुभंगले.

महान कुरुशाच्या काळापासून हखामनी साम्राज्याचे प्रतीक बनलेला पंख पसरलेला सोनेरी गरुड
महान दारियुशाच्या राजवटीत हखामनी साम्राज्याच्या विस्तारलेल्या सीमा दाखवणारा नकाशा : पश्चिमेस इजिप्त, उत्तर आफ्रिका, ग्रीस, तुर्कस्तान, जॉर्जियापासून पूर्वेकडे कझाकस्तान किर्गिझस्तान, पाकिस्तानातील सिंधू नदीचे खोरे व ओमानापर्यंतचा प्रदेश.

बाह्य दुवे

संपादन