अंजनगाव सुर्जी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक मोठी आणि पहिली नगरपालिका आहे तसेच तालुका, व तालुक्याचे शहर आहे. येथे ३० डिसेंबर १८०३ साली इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला होेता, हा तह इतिहासात 'अंजनगावसुर्जी तह' म्हणून प्रसिद्ध आहे.

  ?अंजनगाव सुर्जी

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

२१° ०९′ ५४.५८″ N, ७७° १८′ ३२.७६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
प्रांत विदर्भ
विभाग अंजनगाव
जिल्हा अमरावती
लोकसंख्या ८६,३८० (2011)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ अमरावती लोकसभा
विधानसभा मतदारसंघ अंजनगाव-दर्यापुर विधानसभा
तहसील अंजनगाव सुर्जी
पंचायत समिती अंजनगाव सुर्जी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 444705
• +०७२२४
• MH27

पैठणमधील सुप्रसिद्ध सत्पुरुष थोर संत श्री एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील श्री देवनाथ महाराज (यांचा जन्म अंजनगाव येथेच झाला होता) यांनी येथे १७५४ साली श्री देवनाथ मठ स्थापन केला. त्याच परंपरेतील १८ वे महापुरुष श्री मनोहरनाथ महाराज ( कार्यकाळ - इ.स. १९६० ते इ.स. २०००) यांनी स्वतःच्या कारकीर्दीत हिंदू धर्माची ध्वजा फडकती ठेवली. सर्वश्री दत्तात्रेय तथा नृसिंहसरस्वती, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, गावबा ऊर्फ नित्यानंद, कृष्णनाथ, विश्वंनाथ, मुरारनाथ, रंगनाथ, गोपाळनाथ, गोविंदनाथ ही देवनाथ महाराजांची गुरुपरंपरा तर दयाळनाथ, जयकृष्णनाथ, रामकृष्णनाथ, भालचंद्रनाथ, मारोतीनाथ, गोविंदनाथ , मनोहरनाथ विद्यमान पीठाधीश श्री जितेन्द्रनाथ, ही शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची शिष्यपरंपरा. [१]