अँटोनियस पायस
(ॲंटोनियस पायस या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲंटोनियस पायस (लॅटिन: Titus Aelius Hadrianus Antoninus Augustus Pius) (१९ सप्टेंबर, इ.स. ८६ – ७ मार्च, इ.स. १६१) हा रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट होता.
ॲंटोनियस पायस | ||
---|---|---|
रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट | ||
अधिकारकाळ | ११ जुलै, इ.स. १३८– ७ मार्च, इ.स. १६१ | |
जन्म | १९ सप्टेंबर, इ.स. ८६ | |
लानुविअम, इटली | ||
मृत्यू | ७ मार्च, इ.स. १६१ | |
लोरीअम | ||
पूर्वाधिकारी | हेड्रियान | |
उत्तराधिकारी | मार्कस ऑरेलियस | |
वडील | टायटस ऑरेलिअस फल्वस | |
आई | आरिआ फॅदिल्ला | |
इतर पत्नी | फाऊस्टीना | |
संतती | फाऊस्टीना द यंगर | |
राजघराणे | नेर्व्हा-ॲंटोनायन |
पार्श्वभूमी
संपादनहेड्रियान या रोमन सम्राटाने आपल्या मृत्यूपूर्वी ॲंटोनियस पायस याला आपला वारस निवडले. ॲंटोनियस पायस हा प्राचीन नेर्व्हा-ॲंटोनायन वंशातील होता. याचा जन्म लानुविअम जवळ इ.स. ८६ साली झाला.[१] याच्या वडिलांचे नाव टायटस ऑरेलिअस फल्वस व आईचे नाव आरिआ फॅदिल्ला होते. याच्या आईने नंतर इ.स. ९८मध्ये प्युबिलस ज्युलिअस ल्युपस याच्याशी लग्न केले त्याच्यापासून तिला आरिआ ल्युपिला आणि ज्युलिआ फॅदिल्ला या दोन मुली झाल्या.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ शूल्त्झ, सिलीआ ई. रिलीजन इन रिपब्लिकन इटली (इंग्रजी भाषेत). २ जून, २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)