२०२२ राष्ट्रकुल खेळ क्रिकेट पात्रता
२०२२ राष्ट्रकुल खेळ क्रिकेट पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान मलेशियामध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धेत एकूण पाच देशांनी भाग घेतला. विजेता संघ २०२२ राष्ट्रकुल खेळासाठी पात्र ठरला.
२०२२ राष्ट्रकुल खेळ क्रिकेट पात्रता | |
---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना |
क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी |
यजमान | मलेशिया |
विजेते | श्रीलंका |
सहभाग | ५ |
सामने | १० |
नोव्हेंबर २०२० मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने २०२२ राष्ट्रकुल खेळ स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रिया जाहीर केली. इंग्लंड आपोआप यजमान म्हणून पात्र ठरले आणि १ एप्रिल २०२१ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रमवारीमधील सहा सर्वोच्च संघ इंग्लंडला सामील झाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेद्वारे अंतिम स्थान निश्चित केले जाईल. सर्व सामने क्वालालंपूर मधील किन्रर अकॅडेमी ओव्हल या मैदानावर झाले.
श्रीलंका संघाने सर्व ४ सामन्यात विजय मिळवत राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला.
गुणफलक
संपादनसंघ
|
सा | वि | प | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|
श्रीलंका | ४ | ४ | ० | ० | ८ | ३.९२४ | २०२२ राष्ट्रकुल खेळासाठी पात्र |
बांगलादेश | ४ | ३ | १ | ० | ६ | २.००५ | |
स्कॉटलंड | ४ | २ | २ | ० | ४ | -१.३९३ | |
मलेशिया | ४ | १ | ३ | ० | २ | -२.५२१ | |
केन्या | ४ | ० | ४ | ० | ० | -२.६५१ |
सामने
संपादनवि
|
बांगलादेश
५३/२ (८ षटके) | |
मास इलीसा ११ (११)
रुमाना अहमद २/४ (४ षटके) |
शमीमा सुलताना २८ (१९) विनीफ्रेड दुराईसिंगम २/१४ (२ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश महिला, क्षेत्ररक्षण.
- नुरिल्या नातस्या, नूर दानिया स्युहादा (म) आणि सुरैया अझमिन (बां) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
स्कॉटलंड
७३ (१२.१ षटके) | |
इलेन वॉट्सन ३०* (२६) सचिनी निसनसला २/१० (२.१ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
- स्कॉटलंड आणि श्रीलंका या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्कॉटलंडने मलेशियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- श्रीलंकेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात स्कॉटलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- राचेल स्लेटर (स्कॉ), विश्मी गुणरत्ने आणि सचिनी निसनसला (श्री) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
केन्या
४५ (१२.४ षटके) | |
शॅरन जुमा २४ (२०) नाहिदा अक्तेर ५/१२ (३.४ षटके) |
- नाणेफेक : केन्या महिला, क्षेत्ररक्षण.
- बांगलादेश आणि केन्या या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- केन्याने मलेशियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- बांगलादेशने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
मलेशिया
११७/८ (२० षटके) | |
जामाहिदाया इंतन २४ (३१) कॅथेरिन फ्रेझर ४/१९ (४ षटके) |
- नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
- मलेशिया आणि स्कॉटलंड या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्कॉटलंडने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात मलेशियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
श्रीलंका
८९/१ (९.३ षटके) | |
क्वींटर अबेल ३३ (५३)
चामरी अटापट्टू १/१० (३ षटके) |
चामरी अटापट्टू ५७ (४९) एस्थर वचिरा १/४ (१ षटक) |
- नाणेफेक : श्रीलंका महिला, क्षेत्ररक्षण.
- केन्या आणि श्रीलंका या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- श्रीलंकेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- थरिका सेव्वंदी (श्री) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
केन्या
५४/३ (८ षटके) | |
केथरिन ब्रेस २६ (१९)
लवेंडाह इडांबो १/८ (१ षटक) |
- नाणेफेक : केन्या महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ८ षटकांचा करण्यात आला.
- केन्या आणि स्कॉटलंड या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्कॉटलंडने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
मलेशिया
८९/५ (१८.२ षटके) | |
मेरी म्वांगी २३ (३७)
मास एलिसा २/१९ (४ षटके) |
मास एलिसा ३७ (२६) फ्लाविया ओढियांबो १/९ (१.२ षटके) |
- नाणेफेक : केन्या महिला, फलंदाजी.
- मलेशिया आणि केन्या या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- मलेशियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.