२०२० उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष भालाफेक

(२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भालाफेक या पानावरून पुनर्निर्देशित)

 

भालाफेक
ऑलिंपिक खेळ
Olympic Athletics.png
ऑलिंपिक मैदानी खेळ
स्थळजपान नॅशनल स्टेडियम
दिनांक४-७ ऑगस्ट, २०२१
सहभागी३२ खेळाडू २२ देश
अंतर८७.५८
पदक विजेते
Gold medal  भारत भारत
Silver medal  चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक
Bronze medal  चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक
«२०१६२०२४»

२०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भालाफेक स्पर्धा ४ आणि ७ ऑगस्ट २०२१ रोजी जपान नॅशनल स्टेडियमवर झाली. [] सुमारे ३२ पुरुष आणि आआआ महिला खेळाडूंनी भाग घेतला. पात्रता फेरीतील पहिले ३२ किंवा ८३.५० मी (पुरुष) भाला फेकणाऱ्या १२ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. []

पुरुष

संपादन

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पहिल्याच फेकीत भारताच्या नीरज चोप्राने ८७.०३ इतके अंतर भाला फेकून आपले वर्चस्व दाखवून दिले. जर्मनीच्या जुलियन वेबरने ८५.३० मी फेक करत दुसरे स्थान घेतले. दुसऱ्या फेकीत चोप्राने ८७.५८ मी फेक करीत आपली आघाडी वाढवली, जी कोणालाही पार करता आली नाही.

स्पर्धेच्या शेवटी चोप्राला सुवर्णपदक, चेक प्रजासत्ताकाच्या याकुब व्हाद्लेय्च आणि व्हितेस्लाव व्हेसेली यांना अनुक्रमे रजत आणि कांस्यपदके मिळाली.

ऑलिंपिकमधील मैदानी खेळांत भारतासाठी सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा पहिलाच खेळाडू आहे []

पाकिस्तानचा अर्शद नदीम अंतिम फेरीत ८व्या स्थानावर होता. ऑलिंपिक मधील मैदानी खेळांत अंतिम फेरीत जाणारा हा पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे.[]

तारीख वेळ गोल
बुधवार, ४ ऑगस्ट २०२१ ९:०० पात्रता
शनिवार, ७ ऑगस्ट २०२१ १९:०० अंतिम

निकाल

संपादन

पात्रता नियम: पात्रता कामगिरी ८३.५० मी किंवा किमान १२ सर्वोत्तम कामगिरी करणारे अंतिम फेरीत गेले.

क्र खेळाडू देश #१ #२ #३ #४ #५ #६ फेकीचे अंतर नोंदी
  सुवर्ण नीरज चोप्रा   भारत ८७.०३ ८७.५८ ७६.७९ X X ८४.२४ ८७.५८
  रजत याकुब व्हाद्लेय्च   चेक प्रजासत्ताक ८३.९८ X X ८२.८६ ८६.६७ X ८६.६७ SB
  कांस्य व्हितेस्लाव व्हेसेली   चेक प्रजासत्ताक ७९.७३ ८०.३० ८५.४४ X ८४.९८ X ८५.४४ SB
जुलियन वेबर   जर्मनी ८५.३० ७७.९० ७८.०० ८३.१० ८५.१५ ७५.७२ ८५.३० SB
अर्शाद नदीम   पाकिस्तान ८२.४० X ८४.६२ ८२.९१ ८१.९८ X ८४.६२
अल्याक्सेइ कत्काव्हेट्स   बेलारूस ८२.४९ ८१.०३ ८३.७१ ७९.२४ X X ८३.७१
अँड्रियान मार्डेर   मोल्दोव्हा ८१.१६ ८१.७३ ८२.८४ ८१.९० ८३.३० ८१.०९ ८३.३०
लास्सी एतेल्यातालो   फिनलंड ७८.४३ ७६.५९ ८३.२८ ७९.२० ७९.९९ ८३.०५ ८३.२८
योहान्स व्हेटर   जर्मनी ८२.५२ X X फेकी संपल्या ८२.५२
१० पावेल मियालेश्का   बेलारूस ८२.२८ ७९.३४ ७८.१३ फेकी संपल्या ८२.२८
११ किम अँब   स्वीडन ७७.२२ ७८.३१ ७९.६९ फेकी संपल्या ७९.६९
१२ अलेक्झांड्रु नोव्हाक   रोमेनिया ७७.०३ ७९.२९ X फेकी संपल्या ७९.२९

महिला

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Athletics Competition Schedule". Tokyo 2020. 9 July 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 January 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Qualification System – Games of the XXXI Olympiad – Athletics" (PDF). IAAF. 31 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 31 March 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Tennery, Amy (7 August 2021). "Athletics-Chopra wins historic javelin gold for India". Reuters. 10 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 August 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Tokyo Olympics: Pakistan's javelin thrower Arshad Nadeem makes history". www.thenews.com.pk (इंग्रजी भाषेत). 7 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-08-07 रोजी पाहिले.