२०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिका
२०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिका ही नेपाळमध्ये १७ ते २४ एप्रिल २०२१ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान नेपाळसह नेदरलँड्स आणि मलेशिया ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्व सामने हे किर्तीपूर मधील त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वर खेळविले गेले.
२०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिका | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
मलेशिया | नेपाळ | नेदरलँड्स | ||||||||
संघनायक | ||||||||||
अहमद फियाज | ग्यानेंद्र मल्ल | पीटर सीलार | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
विरेनदीप सिंग (१२०) | कुशल भुर्टेल (२७८) | मॅक्स ओ'दाउद (१७२) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
मोहम्मद वफीक (३) अन्वर रहमान (३) |
संदीप लामिछाने (१३) | सेबस्टीयन ब्राट (५) |
गट फेरीतील ५वा सामना जो की नेदरलँड्स आणि मलेशिया मध्ये खेळवला गेला होता तो सामना पावसामुळे बरोबरीत सुटला. निर्धारीत वेळ निघून गेल्यामुळे सुपर ओव्हर खेळवता आली नाही. परिणामी नेपाळ आणि नेदरलँड्स हे दोन देश गट फेरीत अव्वल दोन स्थानांवर राहिल्याने अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. २४ एप्रिल २०२१ रोजी खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळने नेदरलँड्सचा १४२ धावांनी दणदणीत पराभव करत त्रिकोणी मालिका जिंकली. नेपाळच्या कुशल भुर्टेलला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याने सर्व सामन्यांमधील मिळून स्पर्धेतील सर्वाधिक २७८ धावा केल्या.
गुणफलक
संपादनप्रत्येक संघ विरुद्ध संघाशी दोन-दोन सामने खेळले. गट फेरीच्या शेवटी गुणफलकातील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यात जेतेपदासाठी खेळले.
संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
नेपाळ | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | +२.५०७ | अंतिम सामन्यासाठी पात्र |
नेदरलँड्स | ४ | २ | १ | १ | ० | ५ | -०.४२५ | |
मलेशिया | ४ | ० | ३ | १ | ० | १ | -२.३५९ |
साखळी सामने
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
- शहाब आलम, कुशल भुर्टेल, आसिफ शेख (नेपाळ), ज्युलियन डी मे आणि आर्यन दत्त (ने) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
४था सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.
५वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे मलेशियाला १० षटकांत ९२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
६वा सामना
संपादन
अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.