१९८६ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही २री स्पर्धा श्रीलंकेत मार्च-एप्रिल १९८६ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांनी सहभाग घेतला. श्रीलंकेसोबत चालु असलेल्या राजकीय तणावामुळे भारताने स्पर्धेतून माघार घेतली. १९८४ दक्षिण-पुर्व आशिया चषक जिंकल्याने बांगलादेश या स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि आशिया चषकात पदार्पण केले.

१९८६ आशिया चषक
तारीख ३० मार्च – ६ एप्रिल १९८६
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी
यजमान श्रीलंका श्रीलंका
विजेते श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (१ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर श्रीलंका अर्जुन रणतुंगा
सर्वात जास्त धावा श्रीलंका अर्जुन रणतुंगा (१०५)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान अब्दुल कादिर (९)
१९८४ (आधी) (नंतर) १९८८

स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत पहिलावहिला आशिया चषक जिंकला. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पात्र संघसंपादन करा

क्र. संघ पात्रता
१.   पाकिस्तान आय.सी.सी पुर्ण सदस्य,
२.   श्रीलंका आय.सी.सी पुर्ण सदस्य
३.   बांगलादेश १९८४ दक्षिण-पुर्व आशिया चषक विज्रेते

मैदानेसंपादन करा

श्रीलंका
कोलंबो मोराटुवा कँडी कोलंबो
पैकियासोती सरवणमुट्टू मैदान डि सॉयसा मैदान असगिरिया स्टेडियम सिंहलीज क्रिकेट मैदान
सामने: १ सामने: १ सामने: १ सामने: १

गुणफलकसंपादन करा

संघ
सा वि गुण धावगती
  पाकिस्तान ३.८२३
  श्रीलंका ३.७९६
  बांगलादेश २.७९५

साखळी सामनेसंपादन करा

३० मार्च १९८६
धावफलक
पाकिस्तान  
१९७ (४५ षटके)
वि
  श्रीलंका
११६ (३३.५ षटके)
मोहसीन खान ३९ (४६)
रवि रत्नायके ३/३२ (९ षटके)
पाकिस्तान ८१ धावांनी विजयी
पैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबो
सामनावीर: मोहसीन खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.

३१ मार्च १९८६
धावफलक
बांगलादेश  
९४ (३५.३ षटके)
वि
  पाकिस्तान
९८/३ (३२.१ षटके)
शहीदुर रहमान ३७ (६०)
वसिम अक्रम ४/१९ (९ षटके)
मुदस्सर नाझर ४७ (९७)
जहांगीर शाह २/२३ (९ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
डि सॉयसा मैदान, मोराटुवा
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)

२ एप्रिल १९८६
धावफलक
बांगलादेश  
१३१/८ (४५ षटके)
वि
  श्रीलंका
१३२/३ (३१.३ षटके)
असंका गुरूसिन्हा ४४ (९१)
घोलम फरुक १/२२ (८.३ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
असगिरिया स्टेडियम, कँडी
सामनावीर: असंका गुरूसिन्हा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.

अंतिम सामनासंपादन करा

६ एप्रिल १९८६
धावफलक
पाकिस्तान  
१९१/९ (४५ षटके)
वि
  श्रीलंका
१९५/५ (४२.२ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.