हेर्मान म्युलर (जर्मन: Hermann Müller; १८ मे, १८७६ (1876-05-18), मानहाइम - २० मार्च, १९३१, बर्लिन) हा जर्मनीचा १२वा चान्सेलर होता. तो २७ मार्च ते २१ जून १९२० दरम्यान व २८ जून १९२८ ते २७ मार्च १९३० दरम्यान चान्सेलरपदावर होता.

हेर्मान म्युलर

पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर घडलेल्या वर्सायच्या तहावर सह्या करणाऱ्या जर्मन नेत्यांपैकी म्युलर एक होता.