स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्पेस कॅप्सुल रिकव्हरी एक्सपेरिमेंट (एसआरई) हा उपग्रह पृथ्वीवर परत आणण्यास भारतीय अवकाश शास्त्रज्ञ यशस्वी ठरले आहेत.
प्रयोग
संपादन- ५५० किलो वजनाचा हा उपग्रह, कार्टोसॅट- २ यासह चार उपग्रह एकत्रितपणे पीएसएलव्ही या उपग्रहवाहकाने १० जानेवारीला अवकाशात नेले होते.
- एसआरई कुपीच्या साह्याने अवकाशातच गुरुत्वाकर्षणासंबंधी दोन प्रयोग करण्यात आले.
- परत येताना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर होणारे घर्षण यशस्वीपणे सहन केल्यानंतर पॅराशूट सिस्टिमने कुपीचा वेग कमी करण्यात आला व त्याद्वारे एसआरई कुपी पृथ्वीवर कसलेही नुकसान न होता परत आली.
- ५५० किलो वजनाचा हा उपग्रह ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळी ९.४५ वाजता श्रीहरिकोटापासून १४० किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात बुडाला. त्याचे नेमके ठिकाण भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना सापडले होते.
- एसआरईची कुपी शोधुन ती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) तळावर पाठविण्यात आली.