सोल महानगरी सबवे (कोरियन: ) ही दक्षिण कोरियाच्या सोल शहरामधील उपनगरी रेल्वे सेवा आहे. रेल्वेमार्गाच्या लांबीनुसार जगातील सर्वात लांब तर स्थानकांच्या संख्येनुसार जगात न्यू यॉर्क सिटी सबवेखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोल सबवेने दरवर्षी सुमारे ६९ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या संख्येनुसार सोल सबवेचा जगात दुसरा क्रमांक (तोक्यो सबवेखालोखाल) आहे. सोल सबवे सोल शहर, इंचॉन शहर तसेच ग्याँगी प्रांताच्या मोठ्या भागाला वाहतूक सेवा पुरवते. तसेच ह्या सेवेद्वारे इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील सोलसोबत जोडला गेला आहे.

सोल महानगरी सबवे
स्थान सोल
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग १८
मार्ग लांबी 957.3 कि.मी.
एकुण स्थानके ५९३
दैनंदिन प्रवासी संख्या ६९ लाख
सेवेस आरंभ १५ ऑगस्ट, १९७४
संकेतस्थळ http://www.seoulmetro.co.kr
मार्ग नकाशा

Seoul subway linemap en.svg

स्वच्छता, सुविधा तसेच वक्तशीरपणा इत्यादी बाबतीत सोल सबवे जगातील सर्वोत्तम वाहतूक सेवांपैकी एक मानली जाते. येथील स्थानके तसेच गाड्यांमध्ये सर्वोच्च दर्जाच्या सोयी व सुरक्षा उपलब्ध आहेत.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: