सोनाली बेंद्रे
मराठी चित्रपट अभिनेत्री
सोनाली बेंद्रे ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सोनाली बेंद्रेंचा जन्म १ जानेवारी १९७५ साली मुंबईमधे एका महाराष्ट्रीय कुटुंबात झाला[१]. सोनालीने मुख्यतः बॉलीवूडमधे हिंदी सिनेमांत काम केले आहे. याशिवाय काही तेलुगू, मराठी, तमिळ आणि कन्नड सिनेमांतही तिने काम केलेले आहे.
सोनाली बेंद्रे | |
---|---|
![]() | |
जन्म |
१ जानेवारी, १९७५ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | व्यावसायिक चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | १९९४-२००४ |
भाषा | मराठी, हिंदी भाषा, तमिळ |
प्रमुख चित्रपट | सरफरोश (१९९९), हम साथ साथ है (१९९९) |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | इंडिया गॉट टॅलेंट |
पती |
गोल्डी बहल (ल. २००२) |
अपत्ये | रणवीर |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.imdb.com/name/nm0007114/ |
सोनालीचे १२ नोव्हेंबर २००२ रोजी गोल्डी बहलशी यांच्याशी लग्न झाले[२]. ११ ऑगस्ट २००५ला सोनालीने एका मुलाला (नाव - रणवीर) जन्म दिला[३].
संदर्भ संपादन करा
- ^ Calendar of Historical Events, Births, Holidays and Observances. ISBN 1605011096.
- ^ "bollyvista.com". Sonali Bendre's set to tie the knot!. Archived from the original on 2013-10-05. 9 August 2007 रोजी पाहिले.
- ^ "Sonali Bendre delivers a baby boy". ExpressIndia.com. 12 August 2005. 2010-10-18 रोजी पाहिले.