सेंट मार्टिन-इन-द-फील्ड्स

सेंट मार्टिन-इन-द-फील्ड्स हे इंग्लंडच्या लंडन महानगराती वेस्टमिन्स्टर भागात असलेले चर्च आहे. ट्रॅफालगार स्क्वेरच्या ईशान्य कोपऱ्यावर असलेले चर्च ऑफ इंग्लंडचे हे पॅरिश चर्च आहे. सेंट मार्टिन ऑफ तूर्सला समर्पित आहे. १७२६मध्ये बांधलेल्या या चर्चच्या ठिकाणी पूर्वी मोकळी शेतजमीन होती. त्यात हे चर्च बांधल्याने त्याला हे नाव मिळाले.

इतिहास

संपादन

रोमन काळ

संपादन

२००६ मध्ये केलेल्या उत्खननात इ.स. ३५०च्या सुमारास दफन केलेल्यांचे अवशेष येथे सापडले.[] ही दफनभूमी रोमन प्रथेप्रमाणे रोमन लंडनच्या शहराच्या हद्दीबाहेर होती.

या चर्चच्या आवारात रॉबर्ट बॉयल, नेल ग्विन, जॉन पार्किन्सन आणि सर जॉन बर्केनहेड यांच्यासह अनेक नामवंतांना दफन करण्यात आले.

 
सेंट मार्टिन-इन-द-फील्ड्सचे आतील दृष्य

लंडन शहराच्या मध्यवर्ती भागापासून जवळ आणि वेस्टमिन्स्टरमधील असलेले हे चर्च लंडनमधील सर्वात प्रसिद्ध चर्चांपैकी एक आहे. १९१४-१८ दरम्यान येथील व्हिकार असलेले डिक शेपर्ड यांनी या भागातील बेघरां आश्रय देणे सुरू केले आणि आपल्या चर्चला दारे नेहमी उघडी असलेले चर्च जाहीर केले. आजही येथे तरुण आणि बेघर लोकांना कायम मदत उपलब्ध असते. [] यासाठी दरवर्शी क्रिसमसच्या सुमारास दान गोळा केले जाते. []

उल्लेख

संपादन

सेंट मार्टिन-इन-द-फील्ड्सच्या इमारतीचा बाह्य भाग नॉटिंग हिल, एनिग्मा सारख्या अनेक चित्रपट आणि डॉक्टर हू आणि शेरलॉकसह दूरचित्रवाणी कार्यक्रमांसह चित्रपटांमध्ये वारंवार दिसून येतो.

या चर्चचा उल्लेख खालील कादंबऱ्यांमध्ये आढळतो:

पुण्यातील सेंट मेरी चर्चची रचना सेंट मार्टिनच्या शैलीत करण्यात आली आहे. []

शाही चर्च

संपादन

हे चर्च राजघराण्याचे पॅरिश चर्च आहे, [] तसेच १० डाउनिंग स्ट्रीट मधील युनायटेड किंग्डमचे पंतप्रधानही येथे अनेकदा येतात. []

भिक्षागृहे

संपादन

सेंट मार्टिन-इन-द-फील्ड्स चर्चने २१ सप्टेंबर, १८८६ रोजी स्वतःचे भिक्षागृह सुरू केले. येथील १९ चर्च विश्वस्त महिलांसाठी साप्ताहिक भत्ता देत असत

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Ancient body prompts new theories". BBC News. 1 December 2006. 15 January 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "History". The Connection at St-Martin-in-the-fields. 15 January 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "History". St Martin-in-the-Fields. 16 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 January 2014 रोजी पाहिले.
  4. ^ Mullen, Wayne (2001). Deccan Queen : a spatial analysis of Poona in the nineteenth and early twentieth centuries. OCLC 271844262.
  5. ^ King George I was a churchwarden and Queen Mary attended services regularly.
  6. ^ This falls within its parish, and the Trafalgar Square link strengthens the bond — the church flies the White Ensign of the Royal Navy rather than the Union Flag, and traditionally the church bells are rung to proclaim a naval victory.
चुका उधृत करा: <references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "survey" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.