ट्रफाल्गर स्क्वेर
ट्रफाल्गर स्क्वेअर (इंग्लिश: Trafalgar Square) हा लंडन शहरामधील एक चौक व लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. मध्य लंडन भागातील सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर ह्या बरोमधील चेरिंग क्रॉस ह्या ऐतिहासिक भागात बांधला गेलेला ट्रफाल्गर स्क्वेअर हे लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते.
इ.स. १८०५ सालच्या नेपोलियोनिक युद्धांमधील ट्रफाल्गरच्या लढाईचे स्मारक म्हणून हा भाग बांधला गेला आहे. सध्या अनेक शासकीय तसेच पब्लिक सभा, मेळावे, उत्सव इत्यादींसाठी ट्रफाल्गर स्क्वेअरचा वापर होतो.
गॅलरी
संपादन-
नववर्षाचे स्वागत
-
नाताळादरम्यान ट्रफाल्गर स्क्वेर
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत