सेंट पीटर्सबर्ग–मॉस्को रेल्वे
मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वे (रशियन: Железнодорожная линия Санкт-Петербург — Москва) हा रशिया देशामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. ६५० किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग रशियाची राजधानी मॉस्कोला दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या सेंट पीटर्सबर्गसोबत जोडतो. रशियन साम्राज्याचा झार पहिला निकोलस ह्याच्या आदेशानुसार मॉस्को-लेनिनग्राड रेल्वेमार्गाचे बांघकाम १८४२ मध्ये सुरू झाले व १ नोव्हेंबर १८५१ रोजी ह्या मार्गावरील पहिली रेल्वेगाडी धावली.
मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वे | |
---|---|
प्रकार | द्रुतगती रेल्वे |
प्रदेश | रशिया |
कधी खुला | इ.स. १८५१ |
मालक | रशियन रेल्वे |
चालक | ऑक्टोबर रेल्वे |
तांत्रिक माहिती | |
मार्गाची लांबी | ६५० किमी (४०४ मैल) |
गेज | १५२० मिमी रशियन गेज |
विद्युतीकरण | २५ किलोव्होल्ट एसी |
कमाल वेग | २५० किमी/तास |
प्रवासी संख्येच्या दृष्टीने मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग मार्ग रशियातील सर्वात वर्दळीचा असून ह्या मार्गावर दररोज सुमारे ३२ गाड्या धावतात. सीमेन्स ह्या जर्मन कंपनीने बनवलेली २५० किमी/तास इतक्या वेगाने धावणारी द्रुतगती रेल्वेगाडी ह्या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे असून ती मॉस्को ते सेंट पीतर्सबर्गदरम्यानचे अंतर ३ तास व ३० मिनिटांत पूर्ण करते.
प्रमुख शहरे
संपादनहा रेल्वेमार्ग रशियाच्या लेनिनग्राद ओब्लास्त, नॉवगोरोद ओब्लास्त, त्वेर ओब्लास्त व मॉस्को ओब्लास्त ह्या चार प्रांतांमधून धावतो.