सुरसुंदरी ही भारतीय शिल्पशास्त्रातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. सुरसुंदरी हे शिल्प भारतातील अनेक मंदिरांच्या कोरीव[१]कामात आढळते. सुर अथवा देवलोकातुन आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ आहे. या मुळात यक्षिणी असतात असा समज आहे.[२] त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः मौर्य काळानंतरच्या मंदिरांमधे या सुंदरी दिसून येतात. स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि त्यातील त्याची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात. देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बोध करून देणे हा या सुंदरी अंकित करण्यामागचा शिल्पकार आणि निर्मितीकाराचा हेतू असावा. [३] "क्षीरार्णव" या संस्कृत ग्रंथात सुरसुंदरी यांच्याविषयी सविस्तर विवेचन आले आहे. [४]

सुरसुंदरी 
Le temple de Parshvanath (Khajuraho) (8637289891).jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Сурасундари (ru); सुरसुंदरी (mr); Surasundari (de); Surasundari (en); スラスンダリー (ja); Сурасундарі (uk); சுரசுந்தரி (ta)
खजुराहो येथील सुरसुंदरी

सूरसुंदरींची विविध रूपेसंपादन करा

सुरसुंदरीना देण्यात आलेली नावे ही त्या काय कृती करीत आहेत यावरुन पडलेली आहेत. ती अशी:

 • दर्पिणी - हातात आरसा घेऊन उभी राहुन त्यात आपले रूप न्याहाळत असलेली.
 • डालांबिका - आंब्याची डहाळी हातात धरुन उभी असलेली.
 • पद्मगंधा - हातात पद्म धरुन उभी असलेली व त्याचा सुवास घेत असलेली.
 • मातृका - आईच्या स्वरुपात असलेली, तान्ह्या बाळास कडेवर घेतलेली.
 • चामरी - देवतांवर, थोर लोकांवर चामर धरून उभी असलेली.

काही शिल्पे ही एकट्या नर्तकीची असून काही ठिकाणी समूहाने नर्तकी नृत्य करताना दिसतात. काही शिल्पात या नर्तकी सुडौल बांध्याच्या, देखण्या चेहरा असलेल्या आणि चेहऱ्यावर नृत्य करताना भावपूर्णता असलेल्या असतात.काही वेळेला या शिल्पातील नर्तकी या पायाला घुंगरू बांधत असलेल्या मुद्रेत दिसतात. त्यांची वस्त्रे, त्याचे अवयव यांचे अचूक रेखांकन या शिल्पात केलेले आढळते. अजिंठा, खजुराहो येथील अशा नर्तकी या प्रसिद्ध आहेत. भारतीय प्राचीन मंदिरात बाहेरच्या बाजूला अशा नृत्यांगना कोरलेल्या असतात. याचे कारण म्हणजे देवतेचे रंजन करण्यासाठी नर्तिकेने (?) देवळाच्या रंगशिळा नावाच्या स्थानी उभे राहून नृत्य करायचे असते आणि त्या माध्यमातून देवाला प्रसन्न करायचे असते. [५]

मथुरा शैलीच्या मंदिरात हिची प्रारंभीची शिल्पे पहायला मिळतात. सौंदर्याने परिपूर्ण अशा या सुंदरी कलाकारांनी आपापल्या कौशल्याने दगडात अलंकृत केलेल्या दिसून येतात.[६]

 • नृपूरपादिका - पायात नुपूर बांधतांना.
 • मर्दला - चर्मवाद्य वाजवत असलेली.
 • आलस्यकाया - आळसावलेल्या स्थितीत असलेली, आळस देणारी.
 • शुभगामिनी - पथावरुन मार्गक्रमण करीत असतांना पायात रुतलेला काटा काढतांना.

मंदिरात जाताना भक्ताने आपल्या मनातील वाईट विचार रुतलेल्या काट्यासारखे बाजूला काढून मग देवाला शरण जावे असा भाव यामागे असावा.

खजुराहो तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मार्कन्डादेव मंदिर येथे अशी सुरसंदरी आहे.[७]

 • मांडीवर विंचू असलेली- या सुरसुंदरीच्या मांडीवर विंचू कोरलेला असतो. विंचू हे कामविकाराचे प्रतीक मानले जाते. या सुरसुंदरीचे अवयव पुष्ट दाखविलेले असतात. वासनांवर नियंत्रण करणे असे यातून सूचित केले जाते. आपल्या वाईट गुणांना झटकून टाकून सवत:ला घडविणे असेही हिचे शिल्प सूचित करते.[८]
 • मर्कटासह सुंदरी- ही सुंदरी माकडाच्या बरोबर असते. माकड हे माणसाच्या चंचल मनाचे प्रतीक म्हणून शिल्पात अंकित केलेले असते.[९]
 • स्वाधीनपतिका- आपल्या सौंदर्याने आपला प्रियकर किंवा पती याला स्वतःच्या अंकित ठेवणाऱ्या या सुंदरी शिल्पपटावर अंकित असतात. त्यांच्या मुखावर अहंकार आणि सौंदर्याचा अभिमानही दाखविलेला असतो.[१०]
 • पत्रलेखिका-त्रिभंग अवस्थेत उभी असलेली ही सुंदरी हातातील बोरूने भूर्जपत्रावर लेखन करीत असते. ती प्रियकराला पत्र लिहित आहे असे संकेत दिसून येतात. मंदिरांच्या बाह्य मार्गावर असलेली पत्रलेखिका परमेश्वराच्या विरहात त्यालाच पत्र लिहिते असेही मानले जाते.[४]
 • कंदुकक्रिडामग्ना - चेंडू खेळण्यात रममाण असणारी

तरुण युवतींना चेंडू खेळायला आवडतो असा संदर्भ बाणभट्ट या संस्कृत लेखकाने नोंदविलेला आहे. दंडी या संस्कृत लेखकानेही एका राजकन्येला चेंडू खेळण्याची आवड असल्याचे नोंदविले आहे. शिल्पातील सुंदरी असा चेंडू खेळण्यात मग्न असण्याचे तपशील शिल्पातून दिसून येतात.[११]

 • मुग्धा - मुग्ध करणारी
 • जया

काही ठिकाणी गोपिका, गवळण, हत्तीवर माहूत रूपात बसलेली स्त्री अशीही रूपे अंकित केलेली दिसतात.[३]

चित्रदालनसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ Centre, India International (2010). Water: Culture, Politics and Management (इंग्रजी भाषेत). Pearson Education India. ISBN 9788131726716.
 2. ^ Centre, India International (2010). Water: Culture, Politics and Management (इंग्रजी भाषेत). Pearson Education India. ISBN 9788131726716.
 3. a b डॉ. गो. बं. देगलूरकर (७ जानेवारी २०१८). "मंदिरातील स्त्री रूपे यत्र तत्र".
 4. a b डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ मार्च २०१८). "मंदिरावरील पत्रलेखिका".
 5. ^ डॉ. देगलूरकर गो. बं. (१३ मे २०१८). "नाच नाचूनी अति मी दमले".
 6. ^ डॉ. देगलूरकर गो. बं. (१० जून २०१८). "शिल्पीप्रिय शुकसारिका".
 7. ^ डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ फेब्रुवारी २०१८). "शत्रुमर्दिनी शुभगामिनी".
 8. ^ डॉ. देगलूरकर गो. बं. (२१ जानेवारी २०१८). "विंचू चावला- विंचू चावला".
 9. ^ डॉ. देगलूरकर गो. बं. (४ फेब्रुवारी २०१८). "मन एव्हाना मनुष्याणा".
 10. ^ डॉ. देगलूरकर गो. बं. (४ मार्च २०१८). "एक शृंगार नायिका- स्वाधीन पतिका".
 11. ^ Śrivastava, Vijai Shankar (1981). Cultural Contours of India: Dr. Satya Prakash Felicitation Volume (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 9780391023581.