त्रयो दण्डिप्रबन्धाश्च संपादन

‘शार्ङ्गधरपद्धति’ या राजशेखर लिहित ग्रंथातील एका श्लोकात म्हटले आहे की ’अग्नी, वेद, देव आणि गुण हे जसे तीनच आहेत, तसे आचार्य दंडी कवीचे तीनच प्रबंध (ग्रंथ) त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत.

त्रयोऽग्नयस्त्रयो वेदाः त्रयो देवास्त्रयो गुणाः।
त्रयोदण्डिप्रबंधाश्च त्रिषुलोकेषु विश्रुताः ।।

दंडिनः पदलालित्यम्‌ संपादन

खालील श्लोकात संस्कृत महाकवींपैकी चार कवींची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. कालिदासाची उपमा, भारवी कवीची अर्थपूर्ण शब्दरचना व दंडी कवीचे पदलालित्य. माघ कवीमध्ये हे तीनही गुण आहेत..

उपमा कालिदासस्य । भारवेः अर्थगौरवम्‌ ।
दंडिनः पदलालित्यम्‌ । माघे सन्ति त्रयो गुणाः ॥

संदर्भ संपादन