सुनिधी चौहान
सुनिधी चौहान ( ऑगस्ट १४, १९८३) ही एक भारतीय गायिका व बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका आहे. सुनिधीने वयाच्या चौथ्या वर्षापासून गायला सुरुवात केली. 'मेरी आवाज सुनो' नावाच्या दूरचित्रवाणीवरील स्पर्धात्मक गाण्याच्या मालिकेत सुनिधी विजेती ठरली व त्यातून तिला हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाची संधी मिळाली.
सुनिधी चौहान | |
---|---|
सुनिधी चौहान | |
आयुष्य | |
जन्म | ऑगस्ट १४, १९८३ |
जन्म स्थान | नवी दिल्ली, भारत |
पारिवारिक माहिती | |
वडील | दुष्यंत |
संगीत साधना | |
गायन प्रकार | चित्रपट संगीत |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | पार्श्वगायन |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९९६ - चालू |
दिग्दर्शक रामगोपाल वर्मांच्य मस्त चित्रपटासाठी पार्श्वगायन केल्याने सुनिधी प्रकाशझोतात आली. फिल्मफेर पुरस्कारांसाठी तिला चौदा वेळा नामांकन मिळाले त्यापैकी तीन वेळा तिने पुरस्कार जिंकला. हिंदी चित्रपटसंगीताप्रमाणेच मराठी, तमिळ, कन्नड, तेलुगू, बंगाली, गुजराती आणि आसामी भाषेतील गीतेही सुनिधीने गायली आहेत.
ग्रॅमी पुरस्कार विजेते अमेरिकन गायक एनरिकसोबत सुनिधीने गीत गायले आहे. 'वेस्टर्न युनियन'च्या 'वर्ल्ड ऑफ बेटर' या सामाजिक उपक्रमातून तिला अनेक परदेशी गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली आहे.