सुचित्रा मोर्डेकर

महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्त्या

सुचित्रा माधव मोर्डेकर (१ मे, १९६० - ) या अपंगांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील एक कार्यकर्त्या आहेत. सुचित्रा मोर्डेकर वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओमुळे अपंग होउन सुद्धा त्या चिकाटीने शिकल्या. त्यांचे त्यांचे शालेय, माध्यमिक व उच्च-माध्यमिक शिक्षण कोल्हापूरमधील नूतन मराठी विद्यालय, विद्यापीठ हायस्कूल आणि गोपाल कृष्ण गोखले काॅलेज येथे झाले. त्यांनी इंग्रजी विषय घेऊन एम.ए. पदवी मिळवली.

Suchitra Mordekar

मोर्डेकर यांनी डाॅ.नसीमा हुरजूकरजनी करकरे यांच्याकडून प्रेरित होऊन त्यानी अपंगांसाठी काम करायला सुरुवात केली. कोल्हापूरमधील ‘‘हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड‘’या संस्थेत त्या विश्वस्त सदस्य आणि शाळा विभागाच्या प्रमुख आहेत.

त्यांच्या आईचे नाव सरोजिनी मोर्डेकर आहे.

मैत्री आणि प्रभाव

संपादन

सुचित्रा मोर्डेकर आणि रजनी करकरे देशपांडे यांची गायनाच्या निमित्ताने झालेली ओळख अपंग पुनर्वसन संस्थेच्या कार्यक्रमामध्ये देखील तितक्याच एकरूपतेने बहरत गेली. पुढे संगीताच्या अध्यासनाच्या ध्यासातून पं. विश्वनाथबुवा पोतदार (शास्त्रीय संगीत गुरू आणि साधक), श्री.दिनकर पोवार (सुगम संगीत आणि चित्रपट संगीतकार) यांच्याकडे त्यांचे गान शिक्षण सुरू राहिले. साहजिकच, नसीमा हुरजूक यांच्या सोबतीने सुरू असलेले त्यांचे अपंग पुनर्वसनाचे कार्य आणि त्या बरोबरीने संगीत व कला क्षेत्रात कलांजली सुगम संगीत वर्गाच्या रूपाने त्यांचे सुगम संगीत शिकवण्याचे काम पुढे सुरू राहिले.

संगीत क्षेत्रातील वाटचाल

संपादन

त्यांच्या अपंगत्वाचा विचार करून सुचित्राताई मोर्डेकर यांच्या आईने त्यांना संगीत शिकायला उद्युक्त केले. देवल क्लब पासून सुचित्रा मोर्डेकर यांची संगीताची वाटचाल सुरू झाली. या क्षेत्रात समाधानकारक यश संपादन करण्यासाठी त्यांना श्री.विश्वनाथ पोतदार आणि श्री.दिनकर पोवार हे गुरू लाभले. १९८२ साली एम.ए. (इंग्रजी) झाल्यानंतर आलेली प्राध्यापिकाची नोकरी त्यांनी नाकारली व संगीत क्षेत्रामधील काम अखंडपणे सुरू ठेवले. अनेक खाजगी रेकॉर्डिंग्ज,भावगीते,विविध सामाजिक कार्यामधील त्यांची वाटचाल आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे सुगम संगीत विद्यादानामधील योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे. पुढे १९९४-९५ मध्ये संस्कारभारती संस्थेच्या कार्यकारिणीत त्यांनी संगीत विभाग प्रमुख म्हणून देखील कार्य केले आहे.

कालांतराने, त्यांनी आणि सौ. रजनी करकरे, देशपांडे यांनी एकत्रितपणे, संस्कारभारतीची तत्त्वे असणारी व अनुताई भागवत यांच्याद्वारे नामकरण झालेली 'कलांजली' ही संस्था स्थापन केली. ही संस्था सध्याच्या पिढीला सुगम संगीत क्षेत्राकडे वळविण्याचे, घडवण्याचे आणि ही कला जोपासण्याचे कार्य करत आहे. कलांजली मधील अगदी बलचमूपासून ते वयाची सत्तरी गाठलेल्या वयोगटातील विद्यार्थी/विद्यार्थिनी वर्गामध्ये मध्ये सुचित्रा मोर्डेकर या 'दीदी' म्हणून ओळखल्या जातात. त्या हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड, कोल्हापूर प्रमाणेच कलांजलीतही विद्यादानाचे कामी कार्यरत आहेत.

‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड’शी संलग्न

संपादन

इ.स. १९९४ सालापासून हेल्पर्समध्ये होत असलेल्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सुचित्राताईंचा त्या संस्थेशी संपर्क वाढला आणि हळूहळू त्या रजनी करकरे देशपांडे व पी.डी. देशपांडे यांच्याबरोबरीने संस्थेशी संलग्न झाल्या आणि १९९६ साली घरोंदा वसतीगृहाच्या पायाभरणीसोबत सुचित्राताई ही संस्थेच्याच होऊन राहिल्या. नसीमा हुरजूक यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनीही संस्थेत काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने पाऊल टाकले. आणि २०१३ साली त्या संस्थेतील एक विश्वस्त सदस्या झाल्या. त्या संस्थेच्या शाळा विभागात कार्य करतात.

पुरस्कार

संपादन
  • सांगली येथेल संस्थेकडून अपंग मित्र पुरस्कार
  • तरुण भारत वर्तमानपत्राकडून मुक्ता पुरस्कार,.

संदर्भ

संपादन