सीर दर्या

(सिर दर्या नदी या पानावरून पुनर्निर्देशित)

सीर दर्या (कझाक: Сырдария ; अरबी: سيحون; फारसी: سيردريا; रशियन: Сырдарья; ताजिक: Сирдарё; उझबेक: Sirdaryo) ही मध्य आशियातील एक महत्त्वाची नदी आहे. किर्गिझस्तानउझबेकिस्तानमध्ये उगम पावणारी ही २,२१२ किमी लांबीची नदी ताजिकिस्तानकझाकस्तानमधून वाहते व अरल समुद्राला जाऊन मिळते.

खुजंदमधून वाहणारी सीर दर्या

सोव्हिएत संघाच्या कालखंडात सीर दर्या नदीवर मोठ्या प्रमाणात कालवे खणण्यात आले व जवळजवळ सर्व पाणी सिंचनासाठी वळवले गेले. ह्याचा थेट परिणाम नदीच्या नैसर्गिक संतुलनावर झाला आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत