सिद्धार्थ विधी महाविद्यालय (मुंबई)
सिद्धार्थ विधी महाविद्यालय (सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ) हे मुंबईतील एक कायद्याचे महाविद्यालय असून याची स्थापना १९५६ मध्ये झाली.[१] हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे चालते, जी ८ जुलै १९४५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.[२] समाजातील सर्व घटकांमध्ये कायदेशीर शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून महाविद्यालय तयार करण्यात आले. हे महाविद्यालय एमएनएमआरडीएच्या वारसा सोसायटीद्वारे वारसा रचना म्हणून घोषित केले आहे.[३]
उपलब्ध अभ्यासक्रम
संपादनसध्या महाविद्यालयात तीन वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. परंतु, पाच वर्षे बीएसएल, एलएलबी अभ्यासक्रम देखील प्रस्तावित आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि सर्टिफिकेशन कोर्स देखील महाविद्यालयाद्वारे आयोजित आहेत.
ग्रंथालय
संपादनमहाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये कायद्याच्या पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. महाविद्यालय हे डॉ. आंबेडकरांच्या वैयक्तिक संकलनातील काही दुर्मीळ पुस्तकांचे देखील एक घर आहे, जे भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या संदर्भात वापरण्यात आले होते.[४]
भेटी आणि कार्यक्रम
संपादनपूर्वी महाविद्यालयाला श्रीमती सिरिमावो भंडारनायके सारख्या अनेक व्यक्तिमत्त्यांनी भेट दिली होती. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी.बी. मजूमदार, न्यायमूर्ती रोशन दळवी आणि अनेक अन्य कायदेतज्ज्ञांनी भेटी दिल्या.[५] महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अजमल कसाबच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मुकदम्यास उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली होती, जी सामान्यपणे सामान्य जनतेसाठी प्रतिबंधित होती.[६]
महाविद्यालयाशी संबंधित उल्लेखनीय लोक
संपादन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- न्या. आर.ए. जहांगीर (उच्च न्यायालय मुंबई)[७]
- मोतीलाल चिमणलाल सेटलवाड
- मनोहर जोशी
- पी.एम. सईद (माजी लोकसभा अध्यक्ष)
- न्या. पी.बी. सावंत
- न्यायमूर्ती एम.सी. छगला
- फारूख शेख[८]
- ॲड. के.पी. पवार[९] (न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यासाठी प्रतिवादी वकील म्हणून नियुक्ती केली होती)
- सुरेश सरैया[१०] (क्रिकेटवर प्रसिद्ध रेडिओ कमेंटेटर)
- शांताराम नाईक[११]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Ambedkarmission". Ambedkarmission.org. 2014-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "Affiliation : University Affiliated Colleges > Law > Colleges". Mu.ac.in. 2014-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "DIRECTORY OF BEST COLLEGES 2015: RANKS.JSP |". indiatoday.intoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Rare draft of constitution falling apart in city college - Mumbai Mirror -". Mumbai Mirror. 2018-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Today". Afternonndc.in. 2017-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "'We wanted to throw a shoe at Qasab'". Mid-day.com. 14 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "The Radical Humanist - NEWS-Justice R.A. Jahagirdar is no more!". Theradicalhumanist.com. 2013-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "Farooq Shaikh". IMDb. 2018-03-15 रोजी पाहिले.
- ^ "'Unassuming' Pawar takes the hot seat - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2013-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Suresh Saraiya, one of the best-loved radio commentators". Rediff. 19 July 2012. 14 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "PRS". www.prsindia.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-15 रोजी पाहिले.