मोहम्मद अजमल आमीर इमान ऊर्फ अजमल कसाब (जुलै १३, इ.स. १९८७ - २१ नोव्हेंबर, इ.स. २०१२) हा नोव्हेंबर २६ २००८ रोजी महाराष्ट्रातील मुंबई शहरात घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांत सामील झालेला एक पाकिस्तानी दहशतवादी . या हल्ल्यांमध्ये अटक झालेला कसाब हा एकमेव दहशतवादी होता. पाकिस्तानने आधी कसाब त्यांचा नागरिक असल्याचा इन्कार केला होता. परंतु ७ जानेवारी, इ.स. २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृत रित्या मान्य केले[१].

अजमल कसाब यास तुकाराम ओंबळे यांनी गिरगाव चौपाटी वर अटक केली. अटक करत असताना तुकाराम ओंबळे यांना आपल्या प्राणांची आहुति द्यावी लागली.

कसाबचे नाव हल्ल्याच्या वेळेस चाललेल्या गडबडीत वेगवेगळ्या वृत्तमाध्यमांमध्ये उलटसुलट प्रकारे प्रसारित केले गेले:

अजमल कसाब
आझम आमीर कसाव
अजमल आमीर कमाल
अजमल आमीर कसाब
आझम आमीर कसाब
मोहम्मद अजमल कसम
अजमल मोहम्मद आमीर कसाब
मोहम्मद अजमल आमीर कसर
अमजद आमीर कमाल
मोहम्मद अजमल आमीर कसाब

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Ajmal`s nationality confirmed". Archived from the original on 2013-11-09. १२ जून २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन