दहशतवाद

राजकीय किंवा वैचारिक कारणासाठी हिंसाचाराचा वापर

आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराधी नागरिकांना व्यवस्थेच्या विरोधात धमकी देणे किंवा समाजामध्ये भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे 'दहशतवाद' होय.

जॉन क्रेटमची व्याख्या संपादन

आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करून घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.

स्वरूप संपादन

  • संघटित, नियोजित, हिंसात्मक कृती.
  • राजकीय हेतूने प्रेरित
  • बळजबरी व धमक्या देण्यासाठी शस्स्त्रांचा वापर
  • लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असते.
  • लोकशाहीविरोधी कृत्य, मानवीहक्कांचा भंग
  • स्थानिक ते वैश्विक स्वरूप

कारणे संपादन

आंतरराष्ट्रीय कारणे संपादन

  • राजनैतिक मार्गाने उद्दिष्टे साध्य होत नाहीत म्हणून शत्रू राष्ट्रावर मात करण्यासाठी दहतवाद अंगीकारला जातो.
  • मूलतत्त्ववादी व धार्मिक कट्टरवादी दशतवादाद्वारे आपल्या उद्दिष्टांचा व धार्मिक तत्त्वांचा अंगीकार करू इच्छितात.
  • छोट्या राष्ट्रांना बड्या राष्ट्रांबरोबर युद्ध करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने दहशतवादाचा मार्ग त्यांना फायदेशीर ठरतो.
  • लष्करी सामर्थ्य वाढविण्यापेक्षा दहशतवादास पाठिंबा देणे सोपे असते. उदाहरणार्थ पाकिस्तानचा काश्मीरमध्ये चालू असलेला सरकारपुरस्कृत दहशतवाद.
  • वाढते नागरिकीकरण व शहरीकरण यामुळे होणारा त्रास

सामाजिक कारणे संपादन

  • बेकारी
  • सामाजिक असुरक्षिततेची भावना
  • सुसंवादाचा अभाव
  • दुसऱ्याबद्दल संकुचित वृत्ती व स्पर्धात्मक भावना

आर्थिक कारणे संपादन

सामाजिक कारणे संपादन

  • सत्ताकांक्षा
  • शासनाची उदासीन प्रवॄत्ती व फुटीरवादी चळवळीस प्रोत्साहन
  • सरकारकडून अपेक्षाभंग
  • राजकीय बजबजपुरी

तांत्रिक कारणे संपादन

इतर कारणे संपादन

  • लोकशाही व्यवस्थेचा अभाव
  • असहिष्णुता
  • धार्मिक व वंशिक विद्वेष

दुष्परिणाम संपादन

  • दहशतवादामुळे सामाजिक तसेच राष्ट्राच्या सुरक्षिततेची भावना धोक्यात येते.
  • संरक्षणावरील खर्च वाढून राष्ट्राच्या विकासाची गती मंद होते.
  • दहशतवादी कारवायांमुळे राष्ट्राच्या संपत्तीचे अतोनात नुकसान होते.
  • राष्ट्राच्या विकासाकडे दुर्लक्ष होते.
  • दहशतवादाची शिकार झालेल्या लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होतात.
  • अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात.
  • एकूण राष्ट्राची व शेवटी जागतिक सुरक्षितता भंग पावते.

उपाय संपादन

१. मानवतावादी तत्त्वज्ञानामुळे जागतिक शांतता स्थापण्यासाठी प्रयत्‍न करणे.

२. जमातवाद

कमी करणे.

३. काळ्या पैशाच्या निर्मितीवर प्रतिबंधक उपाययोजना करणे.

४. दहशतवाद संपविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन प्रयत्‍न करणे.

५. शस्त्रास्त्राचा खणखणाट अर्थपूर्ण राजकीय धोरणाला पर्याय ठरू शकत नाही ही समजूत आचरणात आणणे.

६. दशतवादाविरुद्ध कडक कायदे व नियम बनविणे व त्यांची कठोर अंमलबजावणी करणे.

७. दहशतवादास खतपाणी घालणारी देशांतर्गत व्यवस्था नष्ट करणे.

८. सरकाने व नागरिकांनी एकत्र येऊन लढा उभारणे.

दहशतवाद रोखण्यासाठी सरकारने केलेले कायदे संपादन

१. महाराष्ट्र स्थानबद्धता प्रतिबंधक कायदा (१९७०)

२. राजकीय सुरक्षा कायदा (१९८०)

३. महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करणारा कायदा (१९८१)

४. विमान अपहरणविरोधी कायदा (१९८२)

५. दहशतवाद प्रभावित क्षेत्रांसाठी विशेष न्यायालयांची तरतूद (१९८४)

६. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (१९९९) MCOCA

७. टेलिफोन टॅपिंग

धोक्याची तारीख १३ संपादन

१. १३ डिसेंबर २००१ – संसद भवनावरील हल्ला

२. १३ मार्च २००३ – मुलुंड रेल्वे स्थानकावरील हल्ला

३. १३ मे २००८ – जयपूर बॉम्ब स्फोट

४. १३ सप्टेंबर २००८ – दिल्लीतील पाच बॉम्ब स्फोट

५. १३ फेब्रुवारी २०१० – पुण्यातील जर्मन बेकरीतले बॉंबस्फोट

६. १३ जुलै २०११ – दादर, जव्हेरी बाजार, ऑपेरा हाऊस येथे बॉंबस्फोट

भारत-पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना संपादन

  • अल् उमर मुजाहिदीन
  • अल बदर/बदल
  • अल जेहाद फोर्स
  • अल मुजाहिदीन फोर्स
  • अल्लू उम्मा – तमिळनाडू
  • अस जिहाद फोर्स
  • इक्खान उल मुस्लिम
  • इंडियन मुजाहिदीन
  • इख्वाल उल मुजाहिदीन
  • उल्फा : युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम
  • काश्मीर जिहाद फोर्स
  • जमात उद दवा
  • जमियत उलेमा इ-इस्लाम-फझल
  • जम्मू – काश्मीरमधील दहशतवादी संघटना
  • जम्मू – काश्मीर नॅशनल लिबरेशन आर्मी
  • जम्मू – काश्मीर लिबरेशन फ्रंट
  • जानुद-उल-खलिफा-ए-हिंद
  • दिनदा अंजुमन – आंध्र प्रदेश
  • देवबंदी (कडवे)
  • नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅड
  • नक्षलवादी संघटना
  • पीपल्स लिबरेशन आर्मी – मणिपूर
  • पीपल्स वॉर ग्रुप, आंध्र प्रदेश
  • बब्बर खालसा – पंजाब
  • माओवादी कम्युनिस्ट सेंटर – बिहार
  • मुजाहिदीन जिहाद कौन्सिल
  • मुस्लिम मुजाहिद्दीन
  • लष्कर ए तोयबा
  • सिमी (स्ट्युडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया)
  • हरकत उल अंसार/मुजाहिदीन

जागतिक दहशतवादी हल्ले व काही महत्त्वाच्या बाबी संपादन

१) दोन संस्कृतीमधील संघर्ष १९७१ अरब इस्राईल

२) वर्ल्ड ट्रेड सेंटर ११ सप्टेंबर २००१ अमेरिका

३) LTTE श्रीलंका

४) १९८४ साली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या खलिस्तानवादी अतिरेक्यांनी केली

५) १९९१ साली. राजीव गांधी यांची हत्या श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने केली

६) महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा नक्षलवादी प्रभावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो

७) गडचिरोली जिल्ह्यात पीपल्स वॉर ग्रुप ही आंध्रप्रदेशातील नक्षलवादी संघटना कार्यरत आहे

८) ओसामा बिन लादेन हा दहशतवादी सौदी अरेबिया या देशाचा मूळ नागरिक होता .

९) १९९० च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये तालिबान ही दहशतवादी राजवट सत्तेवर आली

१०) उत्तर व दक्षिण आयर्लंडच्या एकत्रीकरणासाठी आयरिश रिपब्लिकन आर्मी ही दहशतवादी संघटना संघर्ष करते.

११) यासर अराफात यांची हे पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी

१२) ओसामा बिन लादेनच्या संघटनेचे नाव ‘अल कायदा’ हे आहे

१३) १९७० च्या दशकात खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाब राज्यात दहशतवादी चळवळ सुरू झाली

१४) २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यांमध्ये ट्विन टॉवर्स या इमारतींवर व लष्कराच्या पेन्टागॉन या इमारतीवर हल्ले झाले

१५) दहशतवाद्यांचे कार्यक्षेत्र आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे

१६) समाजात भीतियुक्त वातावरण निर्माण करणे हे दहशतवाद्यांचे ध्येय आहे.

१७) हिजबुल मुजाहिदीन, हरकत उल अन्सार, जैश ए मोहम्मद इत्यादी दहशतवादी संघटनांचे प्रमुख केंद्र असणारा देश पाकिस्तान आहे

१८) पंजाब ऑपरेशन ब्लू स्टार ६ जून १९८४

१९) पॅलेस्टाइन मुक्ती आघाडी पश्चिम आशियात कार्यरत आहे

२०) दहशतवाद हे एक प्रकारचे छुपे युद्ध आहे

२१) ISI ही दहशतवादी सरकारी संघटना पाकिस्तानमधील आहे

२२) १९७० च्या दशकापासून जगात दहशतवादाने धुमाकुळ घातला आहे.

२३) १९७० च्या दशकापासून धार्मिक मूलतत्त्ववादी दहशतवाद्यांचा व्यापक प्रमाणात प्रसार झाला आहे

२४) भारतातील प्रमुख नक्षलवादी गट ‘पीपल्स वॉर ग्रुप’ हा आहे.

२५) इसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक ॲन्ड सीरिया) ही सीरियामध्ये जन्मलेली दहशतवादी संघटना

२६) इसील : इस्लामिक स्टेटॉफ इराक ॲन्ड लेव्हंट/इस्लामिक स्टेट इन इराक ॲन्ड अल शाम

२७) द मुजाहुदीन शूरा कौन्सिल

पहा : कुप्रसिद्ध दहशतवादी

पुस्तके संपादन

दहशतवादावरती अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही ही :-

  • अधर्मयुद्ध (गिरीश कुबेर)
  • २१व्या शतकातील दहशतवाद (प्रा. म.न. उदगावकर)
  • दहशतवाद (यशवंत पाध्ये)
  • धोका (कादंबरी, संजय सोनवणी)
  • मालेगाव बॉंबस्फोटामागील अदृश्य हात (विक्रम भावे)
  • सिमी (विजय वाघमारे)
  • हिंसा ते दहशतवाद (माधवी कुंटे)