सिगिस्मंड (पवित्र रोमन सम्राट)
(सिगिस्मंड, पवित्र रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
सिगिस्मंड (हंगेरियन: Zsigmond; क्रोएशियन: Žigmund) (फेब्रुवारी १४, इ.स. १३६८ - डिसेंबर ९, इ.स. १४३७) हा इ.स. १३८७ ते इ.स. १४३७ या कालखंडात क्रोएशिया व हंगेरीचा राजा, तर इ.स. १४३३ ते इ.स. १४३७ सालांदरम्यान पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट होता. सिगिस्मंडाने पाश्चात्य शिझम संपवणाऱ्या कॉन्स्टान्स मंडळात महत्त्वाची भूमिका निभावली. परंतु त्यातून उद्भवलेल्या हुसी युद्धांमध्ये त्याचा उत्तरायुष्यातील बराच काळ गेला.
बाह्य दुवे
संपादन- सिगिस्मंडाशी संबंधित चित्रे, नकाशे व अल्प माहिती (इंग्लिश मजकूर) Archived 2007-06-11 at the Wayback Machine.
मागील चार्ल्स चौथा |
पवित्र रोमन सम्राट १४३३-१४३७ |
पुढील फ्रेडरिक तिसरा |