सारंग हरीण

(सारंग हरिण या पानावरून पुनर्निर्देशित)

हरणांचा मुख्य प्रकार - सारंग हरीण हा सस्तन प्राण्यांमधील एक कूळ आहे. यातील प्राण्यांच्या पायांना मुख्यत्वे विभाजित खूर असतात अथवा दोन टाचा असतात. हरणांची दोन मुख्य उपकुळे आहेत. सारंग व कुरंग ही दोन्ही हरणे दिसावयास सारखी असली तरी दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. मुख्य फरक हा शिंगामध्ये असतो.

सारंग हरीण

शिंगे सारंग हरणांची शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. शिंगे ही फक्त नरांना असतात. माद्यांना नसतात. नरांची ही शिंगे भरीव असतात व त्यांना अनेक टोके असतात. पुढे एक टोक असते व मागील बाजूस आणखी टोके असतात. मागील बाजूच्या टोकांची संख्या दोन किंवा अधिक टोकांची संख्या असते. सांबर व चितळांमध्ये पुढे एक व मागे दोन अशी तीन टोके असतात. बाराशिंगाला मागील बाजूस सहा ते आठ टोके असतात. ही शिंगे वर्षातून एकदा गळून पडतात व पुन्हा उगवतात. शिंगाची वाढ होत असताना त्यावर मखमलीचे आवरण असते. त्यामध्ये रक्तवाहिन्याचे जाळे असते. या काळात हरणे इतर नरांशी संघर्ष टाळतात. शिंगाची पूर्ण वाढ झाल्यावर मखमलीचे आवरण वाळून जाते व पोपडे पडतात. या काळात नर हरणे झाडांवर व दगडांवर आपली शिंगे घासून ही पोपडे काढून टाकतात व वीणीच्या हंगामासाठी तयार होतात. वीणीच्या हंगामात नर हरणे इतर हरणांशी संघर्ष करण्यात उत्सुक असतात. एकमेकांशी शिंगे अडकवून नर एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतात. अंतिम विजयी नर हा मादीचा अधिपती होतो. असे नाही की सर्वच नरांना शिंगे असतात. काहींना नसतात अशी हरणे साहजिकच मादीच्या कळपावर हक्क सांगण्यास असमर्थ असतात. परंतु काही शिंगरहित नरही वेगळे डावपेच वापरून इतर नरांना आव्हान देत असतात.

शिंगे नसलेली हरीण मादी पिलू

वावर

सारंग हरणे ही बहुतांशी अमेरिका अशिया व युरोप खंडात आढळून येतात. अफ्रिकेत प्राण्याचे वैविध्य प्रचंड असले तरी तिथे सारंग हरणे नाहीत. सारंग हरणे ही मुख्यत्वे दाट ते घनदाट जंगलात आढळतात. शुष्क व वाळवंटी प्रदेशात त्यांचा वावर नसल्यात जमा आहे.

सारंग हरीण या प्रकारात खालील हरणांचा समावेश होतो

हरणाच्या विविध जाती

संपादन

खुजा जातीतील हरणांचा प्रजनन काळ सहा महिन्यांचा तर इंग्लंडमध्ये त्याच जातीचा हरणांचा प्रजनन काळ हा अठ्ठेचाळीस महिन्यांचा असतो. सारंग हरणी ही बहुतांशी अमेरिका आशिया व युरोप खंडात आढळून येतात. आफ्रिकेत प्राण्यांचे वैविध्य खूप असले तरी तेथे सारंग हरणे नाहीत, सारंग हरणे ही मुख्यत्वे दाट घनदाट जंगलात आढळून येतात. शुष्क व वाळवंटी प्रदेशात त्यांचा जमाव आढळून येतो.